टोक्यो ऑलिम्पिक व्हिलेज बेडस वरून रंगला अनोखा वाद

टोक्यो ऑलिम्पिक्सचे रणशिंग २३ जुलै रोजी फुंकले जात असताना एक मजेशीर वाद चांगलाच रंगला आहे. टोक्यो ऑलिम्पिक व्हिलेज मधील बेडस करोना नियमावली नुसार सोशल डीस्टन्सिंगचे पालन व्हावे या हेतूने मुद्दाम हलक्या वजनाचे आणि कार्डबोर्ड पासून बनविले गेल्याची बातमी न्युयॉर्क टाईम्सने अमेरिकी धावपटू पॉल केलीमो यांच्या ट्विटरवरील पोस्टचा आधार घेऊन दिली होती. त्यात पॉलने ऑलिम्पिक व्हिलेज मधील बेडस अँटी सेक्स आहेत. ते कार्डबोर्ड पासून बनविले गेले आहेत आणि एकावेळी एकच माणसाचे ओझे पेलू शकतात असे म्हटले होते.

करोना मुळे खेळाडूंनी खेळाव्यतिरिक्त अन्य काही करू नये याची काळजी टोक्यो व्हिलेज मध्ये घेतल्याची टीका त्यामुळे सुरु झाली होती. मात्र आयरिस जिमनॅस्ट रीस मॅकलीन याने या बेडवर उडी मारून बेड मजबूत असल्याचे सिद्ध केले आणि ट्विटरवर त्याचा या संदर्भातला एक व्हिडीऑ पोस्ट केला आहे. हे बेड अँटीसेक्स आहेत, कार्डबोर्ड पासून बनविलेत ही बातमी फेक आहे, खोटी आहे असे त्याने पोस्ट केले आहे. टोक्यो ऑलिम्पिक कमिटी आणि बेड बनविणाऱ्या कंपनीने रीस याने सत्य ते समोर आणल्याबद्दल त्याचे आभार मानले आहेत.