जुन्याच स्टारकास्टसोबत टीव्हीवर पुन्हा भेटीला येत आहे ‘द कपिल शर्मा शो’


गेल्या अनेक दिवसांपासून प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा लवकरच त्याच्या ‘द कपिल शर्मा शो’चा तिसरा सीजन भेटीला आणणार असल्याची चर्चा सुरू होती. आता लवकरच फॅन्सची ही प्रतिक्षा संपणार आहे. कारण आपल्या आगामी ‘द कपिल शर्मा शो’ची घोषणा कपिल शर्माने केली आहे. स्वतः त्याच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून ही घोषणा कपिल शर्माने केल्यामुळे पुन्हा टीव्हीसमोर बसून विनोदांचा आनंद लुटण्यासाठी तयार व्हा.

आपल्या ‘द कपिल शर्मा’ शो च्या पुढच्या सीजनमधील स्टारकास्टसह एक फोटो ट्विटर आणि इन्स्टाग्राम अकाउंटवर प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माने शेअर केला आहे. या फोटोमध्ये ‘द कपिल शर्मा’ शो मधील जुनीच स्टारकास्ट दिसून येत आहे. या फोटोंना शेअर करत कपिलने एक कॅप्शन देखील लिहिली आहे. यात त्याने लिहिले आहे की, जुन्या चेहऱ्यांसोबत नवी सुरूवात…” दरम्यान ‘द कपिल शर्मा शो’च्या पुढील सीजनची घोषणा करताना कपिलने स्टारकास्टसोबतचे तीन फोटोज शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये कपिलसोबत भारती सिंह, कीकू शारदा, कृष्णा अभिषेक, चंदन प्रभाकर आणि सुदेश लहरी हे सगळे कलाकार दिसून येत आहेत.


दरम्यान यापूर्वीच द कपिल शर्मा शोमध्ये परणार असल्याची हिंट कॉमेडियन कृष्णा अभिषेक याने दिली होती. कृष्णाने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला होता. यात भारती सिंह आणि कीकू शारदा हे दोघे दिसून येत होते. हे फोटोज शेअर करत कृष्णाने लिहिले होते, लवकरच पुन्हा भेटीला येत आहोत, आमची पहिली क्रिएटीव्ह टीमची मिटींग…खूपच उत्साहित आहे…नवा माल लवकरच भेटीला येत आहे. त्याची ही स्टोरी पाहून तो पुन्हा ‘द कपिल शर्मा’ शो मध्ये एन्ट्री करणार याचा अंदाज सर्वांनी बांधला होताच.

कपिलने यापूर्वीच ‘द कपिल शर्मा’ शो च्या नव्या सीजनची घोषणा केली होती. तो नव्या सीजनसाठी लेखक आणि इतर कलाकारांच्या शोधात होता. आता हा शो पुन्हा सुरू करणार असल्याची घोषणा कपिलने केल्यानंतर त्याचे फॅन्स आनंदीत झाले आहेत. तसेच त्याच्या फोटोवर कमेंट्स करत, आपली उत्सुकता देखील व्यक्त करताना दिसून येत आहेत. पण हा नवा शो कधीपासून ऑन एअर होणार, याबाबतची अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही.