Authum खरेदी करणार अनिल अंबानींची कंपनी


नवी दिल्लीः कंपनीच्या रिझोल्यूशन आराखड्यास रिलायन्स कमर्शियल फायनान्सने (RCFL) मान्यता दिली आहे आणि Authum इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडला (Authum Investment and Infrastructure) यशस्वी बोली लावण्यासाठी निवडले असल्याची माहिती रिलायन्स कॅपिटलने सोमवारी दिली. सुमारे 1,600 कोटी रुपयांमध्ये RCFLचे अधिग्रहण Authumने करणे अपेक्षित आहे. रिलायन्स कॅपिटल लिमिटेडची RCFL ही संपूर्ण मालकीची उपकंपनी आहे, कर्जबाजारी अनिल अंबानींच्या रिलायन्स ग्रुपची ही कंपनी आहे. स्टॉक एक्सचेंजला रिलायन्स कॅपिटलने सांगितले की, लेंडर्सने स्पर्धात्मक प्रक्रियेद्वारे कंपनी घेण्यास यशस्वी निविदाकार म्हणून ऑथम इन्व्हेस्टमेंटची निवड केली आहे. लेंडर्स आणि निविदा करणारे यांच्यात अनेक फेऱ्यांनंतर चर्चा पूर्ण झाली.

रिलायन्स कॅपिटलचे एकूण कर्ज या कराराच्या परिणामी 9,000 कोटींपेक्षा खाली येईल. आरसीएफएलमध्ये लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी, एमएसएमई/एसएमई लोन, इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्सिंग, एज्युकेशन लोन आणि मायक्रो फायनान्सिंग यासह अनेक उत्पादने उपलब्ध आहेत. Authum ही एक सूचीबद्ध कंपनी असून, देशांतर्गत बिगर-बँकिंग फायनान्स कंपनी आहे. सुमारे 15 वर्षांपासून ही कंपनी कार्यरत आहे आणि 30 जून 2021 रोजी त्याची एकूण संपत्ती 2,360 कोटी रुपये होती. Authum सध्या घरगुती, सार्वजनिक आणि खासगी इक्विटीमध्ये लक्षणीय गुंतवणुकीचा अनुभव असणार्‍या व्यावसायिकांच्या टीमद्वारे व्यवस्थापित केला जातो.

सूचीबद्ध कंपन्यांमधील गुंतवणुकीद्वारे Authumची गुंतवणूक धोरण ही दीर्घ मुदतीची मूल्यनिर्मितीसाठी आहे, नॉन-लिस्टेड कंपन्यांना वाढीचे भांडवल उपलब्ध करून देणे, आर्थिक मालमत्ता संपादन करणे, भू संपत्ती गुंतवणूक आणि कर्ज गुंतवणुकीसाठी ही फायदेशीर आहे. याव्यतिरिक्त रिलायन्स कमर्शियल फायनान्सच्या प्रस्तावित अधिग्रहणामुळे कंपनीचा व्यवसाय पोर्टफोलिओ मजबूत होईल. हे एनबीएफसी क्षेत्राला एकाधिक वित्तीय उत्पादने आणि सेवांमध्ये एक व्यासपीठ विकसित करण्यास सक्षम करेल.