थ्रीडी मध्ये रिलीज होणार अक्षय कुमारचा ‘बेलबॉटम’


सध्या आपल्या आगामी चित्रपटांमुळे बॉलिवूडचा खिलाडी कुमार अर्थात अभिनेता अक्षय कुमार बराच चर्चेत आला आहे. अक्षय कुमारचा ‘बेलबॉटम’ हा चित्रपट बऱ्याच दिवसांच्या प्रतिक्षेनंतर अखेर रिलीज होत आहे. या चित्रपटाच्या मेकर्सनी काही दिवसांपूर्वीच चित्रपटाच्या रिलीजची तारीख पुढे ढकलली असल्याची चर्चा रंगू लागली होती. त्यानंतर आता हा चित्रपट थ्रीडी मध्ये रिलीज होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

‘बेलबॉटम’चे निर्माते हा चित्रपट थ्रीडीमध्ये रिलीज करण्याच्या तयारीला लागले असून हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक जेव्हा थिएटरमध्ये येतील, तेव्हा त्यांच्या उत्साह आणखी वाढला पाहिजे, अशी निर्मात्यांची इच्छा आहे. यासाठी निर्माते चित्रपटाच्या तांत्रिक बाबींवर लक्ष केंद्रित करून काम करत आहेत. चित्रपटातील व्हिज्युअल्सपासून ते साउंड इफेक्ट्स आणि बॅक ग्राउंड स्कोरचा डॉलबाय साउंडमध्ये थ्रीडी वर्जनच्या दृष्टीकोनातून काम सुरू केल्यामुळे हा चित्रपट पाहण्यासाठी येणाऱ्या प्रेक्षकांना एक सुखद अनुभव मिळणार एवढे मात्र नक्की आहे.