सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर ईडीला सामोरे जाणार- अनिल देशमुख


मुंबई – सध्या ईडीच्या रडारवर राज्याचे माजी गृह मंत्री अनिल देशमुख असून त्यांना ३ वेळा ईडीकडून समन्स पाठवण्यात आला आहे. पण त्यांनी काही ना काही कारण देऊन ईडीसमोर जाणे टाळले आहे. यातच ईडीने त्यांची ४ कोटींची मालमत्ता जप्त केली गेली आहे. अनिल देशमुखांची ४ कोटी नव्हे तर ३०० कोटी मालमत्ता जप्त केल्याच्या चर्चांना उधाण आले होते. अनिल देशमुख हे मागील काही दिवसांपासून कोणाच्याही संपर्कात नसल्यामुळे ते अंडरग्राऊंड झाल्याची चर्चा देखील होती. आता अनिल देशमुख हे खुद्द सगळ्यांसमोर आले व त्यांनी आपली बाजू मंडळी आहे.

अनिल देशमुख अंडरग्राऊंड आहेत अशी चर्चा राज्यात रंगात असतानाच त्यांचा एक विडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये ते स्पष्ट बोलत आहेत कि, माझी ४ कोटींची मालमत्ता ईडीकडून तात्पुरती जप्त झाली आहे. २०१६ मध्ये २ कोटी ६७ लाखांची जमीन माझा मुलगा सलील देशमुखने घेतली होती, तीही जप्त करण्यात आली असून काही वृत्तपत्रांमध्ये ३०० कोटी जमीन जप्त झाल्याचे छापून आले असून गैरसमज पसरवण्याचे काम चालू आहे.

अनिल देशमुख यांनी पुढे म्हटले आहे कि, ईडीकडून मला समन्स आले आहे, पण मी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. जेव्हा न्यायालय योग्य निर्णय देईल, तेव्हा मी ईडीला सामोरे जाणार आहे. ईडीने तीन वेळा समन्स देऊनही टाळाटाळ केल्यामुळे त्यांच्यावरील संशय अजून वाढत असल्याचा स्पष्ट होत आहे. आता सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देईल यावर लक्ष सर्वांचे लक्ष आहे.