भारताला मागे टाकून पाक कुटुंबाने केले अनोखे रेकॉर्ड

भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये अनेक कारणावरून तुलना असते. त्यात आणखी एका  तुलनेची भर पडली आहे. पाकिस्तानच्या एका कुटुंबाने भारतीय कुटुंबाला पछाडत गिनीज बुक मध्ये एक रेकॉर्ड नोंदविले आहे. पाकिस्तानच्या लरकना येथे राहणाऱ्या अमीर आझाद मांगी यांच्या परिवारातील सर्व ९ सदस्य वेगवेगळ्या वर्षात पण १ ऑगस्ट रोजी जन्मले आहेत. म्हणजेच या सर्व परिवाराचा वाढदिवस १ ऑगस्ट असा आहे. पूर्वी हे रेकॉर्ड भारतीय परिवाराच्या ५ सदस्यांच्या नावावर होते असे समजते.

गिनीज बुक तर्फे मांगी यांना रेकॉर्डचे प्रमाणपत्र दिले गेले आहे. त्यांची पत्नी, ते स्वतः आणि सात मुले पैके चार जुळी या सर्वांचा जन्म १ ऑगस्ट रोजी झाला आहेच पण मांगी यांचा विवाह सुद्धा १ ऑगस्ट रोजी झाला आहे. मांगी व्यवसाने शिक्षक आहेत.

केरळ मधील अन्य एका परिवारातील चार सदस्यांचा वाढदिवस सुद्धा एकच दिवशी म्हणजे २५ मे रोजी असतो. अनिशकुमार, अजिता, मुलगी आणि मुलगा अश्या चौघांचीही जन्मतारीख एकच आहे. अनिशकुमार २५ मे ८१, पत्नी २५ मे ८७, मुलगी आराध्या २५ मे २०१२ तर मुलगा २५ मे २०१९ अशी त्यांची जन्मतारीख आहे. अजिता स्टाफ नर्स आहेत तर अनिश पूर्वी परदेशात नोकरी करत होते ते आता शेती करतात.