अमृता शेरगिल यांच्या १९३८ सालच्या पेंटिंगची ३७.७ कोटीना विक्री

प्रसिद्ध भारतीय कलाकार अमृता शेरगिल यांनी १९३८ मध्ये चितारलेल्या ‘इन द लेडीज एनक्लोजर’ या पेंटिंगचा मुंबईत सॅफ्रॉन आर्ट तर्फे लिलाव केला गेला असून या पेंटिंगला विक्रमी ३७.८ कोटींची किंमत मिळाली आहे. मंगळवारी हा लिलाव झाला. या मुळे अमृता शेरगिल सर्वाधिक किमतीला विकल्या गेलेल्या कलाकृती मध्ये दोन नंबरच्या भारतीय कलाकार ठरल्या आहेत. यापूर्वी व्ही. एस. गायतोंडे यांचे टायटल नसलेले एक चित्र ३९.९८ कोटींना मार्च मध्ये विकले गेले आहे.

अमृता या प्रतिभावान कलाकार होत्या. वयाच्या आठव्या वर्षी त्यांनी पेंटिंग, पियानो वादनात कौशल्य मिळविले होते. त्यांचे शिक्षण फ्रांस मध्ये झाले तरी मनाने त्या शेवटपर्यंत भारतीय होत्या. नऊ श्रेष्ठ भारतीय कलाकारांमध्ये त्यांचा समावेश होता. १९४१ साली त्या पतीसह लाहोर येथे गेल्या होत्या. तेथे त्यांच्या चित्रांचे पहिले प्रदर्शन भरविले जाणार होते. पण दुर्दैवाने आजारी पडून वयाच्या २८ व्या वर्षीच त्यांचे निधन झाले होते.