तुम्ही पाहिला आहे का जगातील सर्वात खतरनाक स्विमिंग पूल


आजवर साधारणतः जमिनीवरील स्विमिंग पूलमध्ये अथवा नदीमध्ये पोहण्याचा आनंद घेतो. पण तुम्ही कधी हवेत तरंग्यात स्विमिंग पूलमध्ये पोहण्याचा आनंद घेतला आहे का? नाही ना… मग आम्ही आज तुम्हाला अशाच एका तरंग्यात स्विमिंग पूल बद्दल सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया नक्की कुठे आहे हा हवेतील तरंगता स्विमिंग पूल….

हा हवेतील तरंगता स्विमिंग पूल इटलीच्या दक्षिण टायरोल प्रांतात असून ह्यूबर्टस हॉटेलच्या टेरेसवर हा पूल बांधण्यात आला आहे. 40 फूट उंचीवर हा स्विमिंग पूल असून 82 फूट लांब आहे. या स्विमिंग पूलावर लावण्यात आलेल्या पारदर्शी काचेमुळे अतिशय सुंदर असून तितकाच धोकादायक आहे. येथे पोहोताना उत्कृष्ट स्वीमरही काळजी घेतात.

काचेच्या फरश्या बसविण्यात या स्विमिंग पूलमध्ये आल्या आहेत. पर्वतरांगांमध्ये भिरल्याचा भास स्विमिंग पूलमध्ये पोहोण्याचा आनंद घेताना होतो. हॉटेल ह्यूबर्टंस येथील हा अद्भूत स्विमिंग पूल जगभरातील एक लक्षवेधी आहे. हा स्विमिंग पूल लोखंडाच्या चार मजबूत पायांवर टिकून आहे. या पुलावरुन खाली पाहिल्यास सुंदर निसर्गरम्य देखावा दिसतो. इटलीतील हा पूल नक्कीच तुम्हाला आवडला असेल.

Leave a Comment