मेट्रोच्या फ्लॅटफॉर्मवर का असते ही पिवळ्या रंगाची लाईन ?


देशाची राजधानी दिल्ली आणि आर्थिक राजधानी मुंबईतील नागरिकांना मेट्रो सेवा ही जाणू काही एक वरदानच ठरली आहे. दिल्लीमधील मेट्रोमुळे फार फायदा झाला आहे. सध्याच्या घडीला दिल्लीच्या प्रत्येक ठिकाणी मेट्रो पोहोचते. दिल्ली आणि मुंबई मेट्रोने अत्यंत अल्पावधीत लोकांच्या मनातही आपले स्थान निर्माण केले आहे. मेट्रो ही कमी वेळात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचण्यासाठी सर्वात चांगली सुविधा मानली जाते.

आपल्या अनेकजणांनी आयुष्यात एकदा तरी मेट्रोने प्रवास केला असेल आणि अनेकांना मेट्रोच्या सुविधा माहिती देखील असतील. पण प्रवासाच्या धावपळीत अशा अनेक गोष्टी असतात ज्या दुर्लक्षित राहतात किंवा त्याकडे आपल्यापैकी कमी लोकांचे त्याकडे लक्ष जाते. त्याबाबत उदाहरण द्याचे झाले तर मेट्रो स्टेशनवर असलेल्या पिवळ्या रंगाच्या लाईन्स.

ही लाइन मेट्रोमधून प्रवास करण्याच्या तुम्ही अनेकदा पाहिली असेल. पण त्याकडे तुम्ही कधीही फारसे लक्ष दिले नसेल. पण आपल्या पैकी कितीजणांनी असा कधी विचार केला आहे का की, ही पिवळ्या रंगाची लाईन का दिलेली असते? पण आम्ही आज तुम्हाला या पिवळ्या लाईन्सचा अर्थ सांगणार आहोत. तुम्ही जेव्हाही मेट्रोची वाट पाहत असता तेव्हा एक अनाउंन्समेंट होते, कृपया पिवळ्या लाईनच्या मागे उभे रहा. सुरक्षा कारणांमुळे ही घोषणा केली जाते. मेट्रो प्लॅटफॉर्मवर तर पिवळी रेषा असतेच. सोबतच मेट्रो स्टेशनच्या एन्ट्रीपासून ते प्लॅटफॉर्मवर जाईपर्यंत ही पिवळी रेषा दिसते.

मेट्रो स्टेशनवर ही पिवळी टाइल्स टेक्टाइल पेविंग असतात. नेत्रहीन लोकांच्या सुरक्षेसाठी आणि मदतीच्या उद्देशाने जी तयार केलेली असते. नेत्रहीन लोक याच्या मदतीने त्यावर चालून त्यांच्या छडीच्या मदतीने रस्त्याची योग्य माहिती घेऊ शकतात.

Leave a Comment