या हॉटेलमधील वाडपी बिकीनी घालून वाढतात जेवण !


आपल्या व्यवसाय वृद्धिसाठी अनेकजण वेगवेगळ्या युक्त्या लढवत असतात. अशा प्रकारच्या युक्त्या करुन ते कोणत्याही परिस्थितीत मागे राहू इच्छित नाही. मग व्यवसाय कुठला ही असोत. पण आपल्या व्यवसाय वृद्धिसाठी चीनमधील एका हॉटेल मालकाने आगळी वेगळी युक्ती लढवली आहे. त्याने आपल्या हॉटेलमध्ये जेवण वाढण्यासाठी वेगळी अवलंबली आहे.

आजवर आम्ही तुम्हाला अनेक रेस्टॉरंटमध्ये रोबोटद्वारे जेवण वाढले जाते, तर कोणी टॉयलेटच्या सीटवर बसवून दिले जाते असे वृत्त दिले आहे. पण चीनमधील या रेस्टॉरंटमधील पद्धत तुम्हाला त्या रेस्टॉरंटकडे तुम्हाला नक्कीच आकर्षित करेल.

Daoxianj हे रेस्टॉरंट चीनच्या श्यांग शहरात असून जास्तीत जास्त ग्राहकांनी यावे म्हणून या हॉटेलच्या मालकाने हॉटेलमध्ये बिकीनी वेटर्स ठेवल्या आहेत. या फीमेल वेटर्स बिकीन घालून जेवण वाढण्याचे काम करतात.

केवळ बिकीनीमध्ये सुंदर दिसणाऱ्या या वेट्रेस येतात. रेस्टॉरंटचं नाव देखील त्यांच्या शरीरावर गोंदलेले पाहायला मिळते. या बिकीनी वेट्रेस ठेवल्यानंतर येथे ग्राहकांची रेलचेल फार वाढली आहे. दरम्यान आता बिकीनी वेट्रेस समोर आहे म्हटल्यावर लोकांचे खाण्यात कमी आणि त्यांच्याकडेच अधिक लक्ष राहते.

या सुंदर वेट्रेसेसचे काही लोक तर फोटो देखील काढतात. यात लोकांना काही आक्षेपार्ह वाटत नाही. पण यावर काही लोकांनी आक्षेप घेतला आहे. याने ग्राहकांवर वाईट प्रभाव पडेल, असे म्हणतात.

Leave a Comment