कुत्र्यांविषयी काही मजेदार माहिती


कुत्रा हा माणसाचा जिवाभावाचा साथीदार मानला जातो. अतिशय इमानदार, वफादार असा हा प्राणी अनेकजण आवर्जून घरात पाळतात. मात्र सर्वाधिक कुत्री अमेरिकेत पाळली जातात. आकडेवारी सांगते, जगातील सर्वात वयोवृद्ध कुत्रा ३० वर्षाचा आहे. सर्वसाधारणपणे कुत्र्याचे वयोमान १२ ते १५ वर्षे असते. माणसाप्रमाणे कुत्र्याला ताप येतो, मधुमेह होतो आणि कॅन्सर सुद्धा होऊ शकतो.


बॉलीवूड अभिनेता अमीरखान याने त्याच्या घरी कुत्रा पाळला आहे आणि त्याचे नाव शाहरुख असे ठेवले आहे असे चर्चिले जाते. कुत्र्याचे नाक इतके तीक्ष्ण असते कि माणसाचे आजारही ते हुंगून ओळखू शकते. कुत्र्याच्या नाकाला आणि पंजाना घाम येतो. कुत्रे उजवीकडे शेपूट हलवत असेल तर ते खुश आहे असे समजले जाते तर डावीकडे शेपूट हलवीत असेल तर ते रागावलेले आहे असे समजले जाते.


कुत्री आणि लांडगे यांचे डीएनए जुळतात कारण त्यांचे पूर्वज एकच होते असे सांगतात. कुत्र्याला सर्वसाधारणपणे ४२ दात असतात आणि जन्मल्याबरोबर कुत्र्याची पिले आंधळी, बहिरी आणि दात नसलेली असतात. एक वर्षातच कुत्रे वयस्क होऊ लागते. कुत्रायची श्रवण क्षमता माणसाच्या पाच पट असते तर वास घेण्याची क्षमता माणसाच्या १ हजार पट असते. कुत्र्याच्या मिशा त्याला अंधारात पाहताना उपयोगी पडतात.


कुत्र्याला वेळेचे भान असते तसेच कधी काय करायचे हे त्याला समजते. कुत्रे त्याचा मालकाला नेहमी मिस करते आणि दोन वर्षाच्या मुलाइतकी त्याला समज असते. त्यामुळे कुत्र्याला प्रशिक्षण दिले तर बऱ्याच गोष्टी ते शिकू शकते. कुत्राचे मूत्र अतिशय अॅॅसिडिक असते त्यात धातु विरघळू शकतो. कुत्रे काळा, पांढरा, पिवळा आणि नीळा रंग पाहू शकते. रात्रीच्या वेळी माणसापेक्षा कुत्रे अधिक चांगले पाहू शकतात.

कुत्राला सुद्धा स्वप्ने पडतात आणि अनेकदा ते झोपेत स्वप्न बघताना हात पाय हलवितात. माणसाच्या रक्ताचे चार गट मानले जातात तर कुत्र्याच्या रक्ताचे १३ गट आहेत. चॉकलेट हे कुत्र्यासाठी विष ठरू शकते. जगात ४० कोटींपेक्षा अधिक कुत्री आहेत. चीन, मलेशिया देशात कुत्र्याचे मांस खाल्ले जाते.

Leave a Comment