बाजारात आल्या मजेदार स्मार्ट छत्र्या


पावसाळा सुरु झाला आहे आणि काही ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. पाउस आला कि पहिली गरज भासते ती छत्र्यांची. विविध ठिकाणचे बाजारही आता विविध प्रकारच्या छत्र्या, रेनकोटनी सजू लागले आहेत. पायी चालणाऱ्यांना पावसात छत्री सोयीची. पण आता दुचाकी वाहनचालक, कार चालक याच्यासाठी सुद्धा स्मार्ट छत्र्या तयार केल्या गेल्या असून बाजारातील ते मोठे आकर्षण बनले आहे. यातील काही छत्र्या अगदी हायटेक आहेत.


कॅन्डी सेल्फी रॉड ब्ल्यूटूथ अम्ब्रेला हा असाच एक खास प्रकार असून ही छत्री ब्ल्यूटूथ कनेक्टीव्हिटीसह आहे. त्याला जी स्टिक दिली गेली आहे त्याचा वापर सेल्फी स्टिक म्हणून करता येतो. छत्रीला जी क्लिप आहे त्यात फोन फिक्स करून फोटो काढता येतात. छत्रीच्या आत थ्रीप्रिंट वाले फ्लोरल डिझाईन आहे त्यामुळे छत्री उघडली कि मोठे फुल उमलल्याचे भासते.


दुसरा प्रकार आहे सेवन टेक ब्ल्यूटूथ स्पीकर छत्री. यात हँडल मध्ये ब्ल्यूटूथ स्पीकर असून ते फोनशी कनेक्ट करता येतात. पावसात फिरताना त्यामुळे आवडीची गाणी ऐकण्याची मजा लुटता येते. यात आवाज कंट्रोलसाठी बटन दिले गेले असून गाणे बदलायचे असेल तरी ते हँडलवरच्या बटनांच्या मदतीने बदलता येते. यात मायक्रो एसडी कार्ड लावून म्युझिकचा आनंद घेता येतो. याच हँडल मध्ये बिल्ट इन रीचार्जेबल बॅटरी दिली गेली आहे.


अमेझॉन ब्रांड छत्री मध्ये उघडबंद करण्यासाठी सिंगल टच बटन असून छत्री बंद केली कि ती छोट्या आकारात फोल्ड होते. त्यामुळे छत्री बाळगणे सोयीचे आहे. ती मजबूत स्टील आणि १०० टक्के पोलीएस्टर कापडापासून बनविली गेली आहे. फिशिंग कॅप अम्ब्रेला हा प्रकार पावसात फार उपयुक्त नाही. मात्र मासे पकडताना ती फार उपयोगी आहे. ही छत्री डोक्यावर फिक्स बसते. त्यामुळे उन्हापासून बचाव होतो तसेच दोन्ही हात मोकळे रहातात.

न्युब्रेला हँडफ्री ही न्युब्रेला ब्रांडची छत्री स्टायलिश आहे आणि बॅगसारखी घालता येते. ती खांद्यावर बॅग सारखी अडकविली की त्यातली छत्री डोक्यावर उघडली जाते. बेल्टच्या मदतीने ती शरीरावर चांगल्या प्रकारे फिक्स करता येते आणि वाऱ्याने उडून जाण्याची भीती राहत नाही. दुचाकी चालविणाऱ्याना ती उपयुक्त असली तरी या छात्रीमुळे डोके कोरडे राहते पण संपूर्ण शरीराचे पावसापासून संरक्षण होत नाही.

Leave a Comment