जगातली महागडी अंगठी- किंमत ५२० कोटी रूपये

diamond
हातात घालायची अंगठी अगदी भले हिर्‍याची असली तरी महाग असून असून किती असणार असे जर आपल्याला वाटत असेल तर या अंगठीविषयी जाणून घेणे इष्ट ठरेल. विटल्सबॅक ग्राफ डायमंड रिंग म्हणून ओळख असलेल्या निळ्या रंगाच्या हिर्‍याच्या अंगठीची किंमत आहे तब्बल ८ कोटी डॉलर्स म्हणजे ५२० कोटी रूपये. ही जगातील सर्वात महाग अंगठी समजली जाते.

मिळालेल्या माहितीनुसार ऑस्ट्रेलिया बोवारियन क्राऊन ज्युवेलरी मार्केटमध्ये हा हिरा विक्रीसाठी आला होता. तो लंडनच्या लॉरेन्स ग्राफने २००८ साली १५२ कोटी रूपयांना खरेदी केला. त्यानंतर त्याने या हिर्‍यात आणखी बदल घडविले त्यामुळे तो अधिकच सुंदर बनला. हिर्‍याचे वजन होते ३५.५६ कॅरेट. नवीन पैलूंमुळे हिर्‍याची किंमतही वाढली आणि २०११ साली ही अंगठी कतारच्या रॉयल फॅमिलीने ५२० कोटी रूपयांना खरेदी केली.

यापूर्वीची महाग हिरेअंगूठी म्हणून २०१३ सालपर्यंत ग्राफ पिंक डायमंड रिंग ओळखली जात होती. आफ्रिकेच्या खाणीत सापडलेला हा मूळचा हिरा तब्बल १३२ कॅरेटचा होता पण तो पैलू पाडून ५९.६ कॅरेटचा बनविला गेला. मूळचा हिरा लिलावात ८.३ कोटी डॉलर्सना विकला केला होता. इसाक वूल्फ नावाच्या इसमाकडे असलेली ही अंगठी सौदीत ७.२ कोटी डॉर्लसला म्हणजे ४६८ कोटी रूपयांना विकली गेली.

Leave a Comment