नताशा पूनावालाची हँडबॅग सोशल मीडियावर व्हायरल

करोना लस निर्मितीमध्ये अग्रणी असलेल्या पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटचे नाव आज जगात प्रसिद्धीच्या झोतात आहे. साहजिकच या इन्स्टिट्यूटचे चालक अदार पूनावालाही चर्चेत आले आहेत. त्यांची पत्नी नताशा मात्र फारशी चर्चेत नाही. पण गेल्या काही दिवसात तिचे फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाले आहेत. तेही तिच्या हातातील पर्स मुळे.

नुकत्याच पार पडलेल्या विंबल्डन टेनिस स्पर्धेच्या अंतिम सामन्यात बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि नताशा पूनावाला शेजारी बसलेल्या दिसल्या. प्रियांकाने नताशा सोबतचे फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकौंटवर शेअर केले. व्हाईट आउटफिट, स्टायलिश सनग्लासेस घातलेल्या नाताशाच्या हातातील निळ्या रंगाची हँडबॅग यात विशेष नजरेत भरली. सोशल मीडियावर ही छोटीशी बॅग चर्चेचा विषय ठरली.

हर्मीस कलेक्शनच्या लिमिटेड एडीशन ‘द बर्वीन फौबोर्ग’चा हिस्सा असलेल्यी ही बॅग आहे. जगभरातील सेलेब्रिटी या प्रकारच्या बॅग खरेदी करतात आणि संधी मिळताच त्याचे प्रदर्शन करतात. ही बॅग साधारण नाही तर जगातील सर्वाधिक महागड्या बॅग पैकी एक आहे. या बॅग्जच्या किमती ८२ ते ९७ लाख रुपये या दरम्यान आहेत.

२० सेंटीमीटर लांबीची ही बॅग उत्तम दर्जाचे लेदर आणि खास धातू वापरून बनविली गेली आहे. तिच्या खास डिझायनिंग मुळे ती मौल्यवान मानली जाते. नताशाचे फिल्म इंडस्ट्री मध्ये खूप दोस्त असून करीना, करिश्मा, मलाईका आणि अमृता या तिच्या खास मैत्रिणी आहेत.