भारतात आली ५ कोटींची लोम्बर्गिनी हुरकेन एसटीओ

इटलीच्या सुपरस्पोर्ट्स लग्झरी कार निर्मात्या लोम्बर्गिनीने त्यांची २०२१ हुरकेन एसटीओ भारतात लाँच केली आहे. या कारची एक्स शो रूम किंमत ४ कोटी ९९ लाख रुपये असून ही कार जागतिक बाजारात २०२० मध्येच पेश करण्यात आली आहे. भारतात ती जुने मॉडेल हुरकेनची जागा घेईल असे सांगण्यात आले आहे.

नवी हुरकेन एसटीओ पहिल्या मॉडेलच्या तुलनेत वजनात ४३ किलोने हलकी आहे. कार बनविताना ७५ टक्के कार्बन फायबरचा वापर केला गेला आहे. कारचा विंडस्क्रीन सुद्धा वजनाने २० टक्के हलका असून या कारचे एकूण वजन १३३९ किलो आहे.

या कारला ५.२ लिटरचे नॅचरली एस्पीरेटेड व्ही १० पेट्रोल इंजिन दिले गेले असून ही कार ० ते १०० किमीचा स्पीड ३ सेकंदात तर २०० किमी पर्यंतचा स्पीड ९ सेकंदात घेते. या कारचा टॉप स्पीड आहे ताशी ३१० किमी. चार सिटर आणि पाच सिटर अश्या दोन ऑप्शन मध्ये ती उपलब्ध आहे. या कारला रोड ओरीएंटेड एसटीओ, ट्रॅक फोकस्ड ट्रॉफी आणि सेल्फ एक्सप्लेन ट्री रेन असे तीन ड्रायव्हिंग मोड आहेत. सिग्नेचर स्विफ्टबॅक एलईडी हेडलँप, डब्ल्यू शेप्ड एलईडी डे टाईम रनिंग लँप्स दिले गेले आहेत.