स्मार्ट नखे वापरा आणि करा दणकून खरेदी

शॉपिंग हा प्रामुख्याने महिलांचा प्रांत मानला जातो. अनेकदा शॉपिंग केल्यावर क्रेडीट डेबिट कार्ड घरी राहिल्याचे किंवा पर्स बरोबर नसल्याचे लक्षात येते आणि मग खरेदी केलेल्या वस्तू तशाच दुकानात सोडून घरी येण्याची पाळी येते. मात्र आता दुबईतील महिलांवर अशी पाळी येणार नाही. याचे करण आहे मायक्रोचीप मॅनीक्यूअर. यात तुमच्या नखावरच एक मायक्रोचीप बसविली जाते आणि तुमचे नख चालते फिरते बिझिनेस कार्ड बनून जाते.

दुबईच्या लानॉर ब्युटी लाउंज तर्फे ही सेवा सुरु केली गेली आहे. यात एनएफसी चीप, सलून मध्ये जाऊन नखावर बसवून घ्यायची आहे. त्यासाठी सुई किंवा सर्जरीची अजिबात आवश्यकता नाही. ही अगदी छोटी चीप नखावर ठेऊन त्यावर खास कोटिंग दिले जाते. या चीप मध्ये तुमच्या सोशल मिडिया प्रोफाईलपासून बिझिनेस कार्ड पर्यंत सर्व डेटा असतो. स्कॅन करून हा डेटा डी कोड करता येतो.  नियर फिल्ड कम्युनिकेशन, एनएफसी वर काम करणारी शॉर्ट रेंज वायरलेस टेक्नोलॉजीचा यासाठी वापर केला गेला आहे. या टेक्नोलॉजीमुळे स्मार्टफोन, पेमेंट कार्ड व अन्य डिव्हायसेस स्मार्ट होतात.

हेच तंत्रज्ञान नखावर बसविलेल्या चीप मध्ये वापरले गेले आहे. दुबई मध्ये सध्या ५०० महिलांनी ही सेवा घेतली असून स्वतःची नखे स्मार्ट करून घेतली आहेत. करोना काळात ही स्मार्ट नखे फार महत्वाची ठरली असल्याचे आणि त्यामुळे सोशल डीस्टन्सिंग, प्रत्यक्ष स्पर्श न करता आवश्यक पेमेंट करणे शक्य झाले आहे. या चीपसाठी ७० डॉलर्स म्हणजे ५ हजार रुपये खर्च करावे लागतात. चीप बसविल्यावर नखावर नेलपेंट सुद्धा लावता येते असे समजते.