‘ॲम्फोटेरिसीन’ आणि ‘टोसिलिझुमॅब’ औषधांच्या योग्य वितरणासाठी विभागाचे नोडल अधिकारी नियुक्त


मुंबई : कोविड-19 या काळात ॲम्फोटेरिसीन आणि टोसिलिझुमॅब इंजेक्शनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली. या औषधांचे वितरण योग्य प्रकारे व्हावे, यासाठी त्यांचे नियंत्रण करण्याचे निर्देश मा. उच्च न्यायालयाने दिले होते. त्यानुसार अन्न व औषध प्रशासनाने पुढीलप्रमाणे नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक केलेली आहे.

यात 1) दा.रा.गहाणे, सह आयुक्त (मुख्यालय), महाराष्ट्र राज्य, मो.क्र.9892832289; 2) गौ.वा. ब्याळे, सह आयुक्त (औषधे) (बृहन्मुंबई), बृहन्मुंबई, मो.क्र.9892836216; 3) वि.तु.पौनिकर, सह आयुक्त (औषधे) (कोकण विभाग), कोकण विभाग, मो.क्र.9850272495; 4) दुष्यंत भामरे, सह आयुक्त (औषधे) (नाशिक) नाशिक विभाग, मो.क्र.9820245816; 5) एस.एस.काळे, सह आयुक्त (औषधे) (औरंगाबाद), औरंगाबाद विभाग, मो.क्र.9987236658; 6) एस.बी.पाटील, सह आयुक्त (औषधे) (पुणे), पुणे विभाग, मो.क्र.9326035767; 7) अशोक बर्डे, सह आयुक्त (औषधे) (अमरावती), अमरावती विभाग, 9833445208; 8) महेश गाडेकर, सह आयुक्त (औषधे) (नागपूर), नागपूर विभाग, 7709190076 असे अधिकारी आहेत. जिल्हा स्तरावर सदरील औषधांचे वितरण जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनाखाली करण्यात येते. त्यानुसार संबंधित जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधण्यात यावा.

मुंबईसाठी संपर्क
मुंबईत Tocilizumab Injection चे वितरण अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचेकडून करण्यात येते, तर Amphotericin Injection चे वितरण के.ई.एम. रुग्णालय, मुंबई यांच्या निदर्शनाखाली करण्यात येते. याबाबत के.ई.एम. रुग्णालयाचा संपर्क तपशिल डॉ. प्रविण बांगर, मो.क्र.7977214118 असा आहे.