बीजीएमआय बरोबर टेस्लाच्या भागीदारीने वाढणार गेममधला रोमांच

बॅटलग्राउंड मोबाईल इंडिया (बीजीएमआय) डेव्हलपर कंपनी क्रॅफ्टॉन ने मंगळवारी एलोन मस्क यांच्या इलेक्ट्रिक कार टेस्ला बरोबर भागीदारी केल्याची घोषणा केली आहे. याची स्पष्ट छाप प्लेअर्सना गेमिंग मध्ये दिसणार आहे. प्रत्यक्षात नाही तरी बीजीएमआय प्लेअर खेळताना टेस्लाच्या मॉडेल मधून झन्नाटेदार ड्रायविंग गेमिंगचा अनोखा अनुभव घेऊन शकतील.

विशेष म्हणजे टेस्ला कार खऱ्या मॉडेल प्रमाणे ऑटोपायलट मोड सह असेल. नवीन अपडेट नंतर प्लेअर मस्क यांच्या गिगा फॅक्टरी मध्ये प्रवेश करू शकतील. तेथे मॉडेल वायच्या कारच्या उत्पादनाची प्रोसेस आरंभापासून शेवटपर्यंत पाहू शकतील. नवी टेस्ला वाय मॉडेल कार निवडण्याचे ऑप्शन प्लेअरला मिळेल. मग कार ड्राईव्ह करता येईल. टेस्लाच्या सर्व कार प्लेअरना ग्राउंड ब्रेकिंग ऑटो पायलट फिचरचा अनुभव देतील. या कार ड्राईव्ह करण्याची गरज नाही त्यामुळे गेम खेळताना खुपच मजा अनुभवता येणार आहे.

ही कार सेमी बॉक्स सह असेल आणि त्यात काही खास रुट्स म्हणजे मार्ग दिसणार आहेत. प्लेअर सेमी ब्लॉक्स नष्ट करून सप्लाय बॉक्स पाडू शकतील. येथे लढायची सर्व सामग्री मिळेल, नवीन हत्यारांसह अपडेट मिळणार आहे. त्यात एमजी ३ सह मेडिकल आयटमचा समावेश असेल असे समजते.