‘या’ तारखेला भारतात लॉन्च होणार रेडमीचा जबरदस्त 5G स्मार्टफोन


भारतामध्ये रेडमी लोट 10टी 5G हा स्मार्टफोन कधी लॉन्च होणार याबाबत स्मार्टफोन युझर्समध्ये कमालीची उत्सुकता होती. याची प्रतीक्षा आता संपली असून हा स्मार्टफोन भारतात 20 जुलै रोजी लॉन्च होणार आहे. काल, सोमवारी शाओमी कंपनीकडून याबाबत घोषणा करण्यात आली आहे. नवीन रेडमी नोट 10 सिरीज लॉन्च केल्यानंतर रेडमी नोट 10, द रेडमी नोट 10 प्रो आणि रेडमी नोट 10 प्रो मॅक्ससोबत हा नवीन रेडमी लोट 10टी 5G देखील आता मिळू शकणार आहे.

शाओमी इंडिया कम्युनिकेशन्सचे प्रमुख कस्तुरी पालाढी यांनी रेडमी लोट 10टी 5G च्या लॉन्चिंग संदर्भात एक व्हिडीओ जारी केला आहे. यात हा फोन भारतात 20 जुलैला लॉन्च होणार असल्याचे म्हटले आहे. मागील आठवड्यातच अॅमेझॉनने रेडमी नोट 10 टीच्या भारतातील लॉन्चिंगसंदर्भात एक टीजर रिलीज केला होता.


रेडमी नोट 10टी (रेडमी लोट 10टी 5G) ची किंमत भारतात किती असेल याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. पण हा स्मार्टफोन रशियन व्हेरियंटसारखा दिसत आहे. हा फोन रशियामध्ये जवळपास 20,500 रुपये किमतीमध्ये लॉन्च केला होता. रेडमी नोट 10टी 5जी स्मार्टफोन अॅन्ड्रॉईड 11 वर आधारीत आहे, जो MIUI वर काम करेल. या स्मार्टफोनचा डिस्प्ले 6.5 इंच फुल एचडी+ (1,080×2,400 पिक्सल) असेल. फोनमध्ये मीडियाटेक डायमेंसिटी 700 प्रोसेसर असेल तर 6GB रॅम असेल. या स्मार्टफोनला ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप दिला आहे. ज्याचा प्रायमरी कॅमेरा 48 मेगापिक्सल आहे. सोबतच 2 मेगापिक्सलचा मायक्रो तर 2 मेगापिक्सलचा डेप्थ कॅमेरा देखील देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी आठ मेगापिक्सल कॅमेरा आहे. फोनला 128 जीबीचे स्टोअरेज दिले आहे. तर 5,000 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.