WhatsApp च्या ‘या’ नव्या फीचरमुळे आपोआप डिलीट होतील मेसेज


नवी दिल्ली : यूजर्सला उत्तम चॅटिंग अनुभव प्रदान करण्यासाठी इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप WhatsAppने आतापर्यंत एकापेक्षा एक दमदार फीचर्स सादर केली आहेत. यातच iOS बीटा यूजर्ससाठी आता कंपनीने Disappearing messages फीचर्सला व्ह्यू वन्स नावाने जारी केले आहे. हे फीचर स्नॅपचॅटप्रमाणे काम करते. हे फीचर अ‍ॅक्टिव्ह केल्यानंतर चॅटमधील व्हिडीओ आणि फोटो आपोआप डिलीट होतील.

रिपोर्टनुसार, आयओएससह अँड्राइड बीटा यूजर्ससाठी देखील हे फीचर उपलब्ध आहे. हे फीचर इनेबल केल्यानंतर रिसिव्हर आणि सेंडर दोन्हींच्या फोनमधील मेसेज आपोआप डिलीट होतील. यासोबतच, यूजर्स मेसेज इंफो ऑप्शनमध्ये जाऊन मेसेज कधी डिलिव्हर झाला आणि कधी पाहिला याची माहिती घेऊ शकतात. या फीचरमध्ये सध्या काही त्रुटी आहेत, ज्या दुरुस्त केल्या जात आहेत. सध्या हे फीचर बीटा व्हर्जन यूजर्ससाठी उपलब्ध आहे. पण, view once फीचर लवकरच सर्व यूजर्ससाठी रोलआउट केले जाईल.