केआरकेची भविष्यवाणी ; १० वर्षांतच निक देईल प्रियांकाला सोडचिठ्ठी


आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे अभिनेता कमाल आर खान हा नेहमीच चर्चेत असतो. केआरके गेल्या अनेक दिवसांपासून बॉलिवूड कलाकारांशी पंगा घेताना दिसत आहे. बॉलिवूडचा भाईजान सलमान खानशी पंगा घेतल्यानंतर मिका सिंगने त्याला ट्रोल केले होते. केआरकेने यानंतर अनेक कलाकारांवर टीका केली. आता केआरकेने बॉलिवूडमधील अनेक कलाकारांविषयी भविष्यवाणी केली आहे.

कंगना, करीना कपूर, सैफ अली खान विषयी केआरकेने ट्विट करत भविष्यवाणी केली आहे. दरम्यान, सगळ्यांचे लक्ष हे केआरकेने बॉलिवूडची देसी गर्ल आणि पती निक जोनासच्या नात्यावर केलेल्या भविष्यवाणीने वेधले आहे. प्रियंका आणि निकच्या नात्या विषयी केआरकेने ट्विट करत भविष्यवाणी केली आहे. निक पुढच्या १० वर्षांमध्ये प्रियंकाला घटस्फोट देईल, अशा आशयाचे ट्विट केआरकेने केले आहे. त्याचे हे ट्वीट पाहिल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केले आहे. एक नेटकरी म्हणाला, तुला हद्दीत कसे राहायचे हे शिकवण्याची गरज आहे. ते काहीही करू शकतात, परंतु कोणाच्याही वैयक्तिक जीवनावर भाष्य करण्याचा तुला अधिकार नाही.

त्याचबरोबर केआरकेने कंगनाच्या बाबतीत ही एक भविष्यवाणी केली आहे. कंगना कधीच लग्न करणार नाही, असे ट्विट केआरकेने केले. तसेच करीना आणि सैफची दोन्ही मुले त्यांच्या नावामुळे यशस्वी अभिनेते होणार नसल्याचे देखील ट्विट केआरकेने केले आहे.