जुना स्मार्टफोन विकताना अशी घ्या काळजी

बाजारात दररोज नवे स्मार्टफोन दाखल होत असतात. आणि बऱ्याच जणांना आपण नवा, अधिक फिचर्स असलेला स्मार्टफोन घ्यावा असे वाटत असते. पण जुन्या स्मार्टफोनचे करायचे काय असाही प्रश्न पडतो. बरेचदा असे जुने फोन एक्स्चेंज करून नवे स्मार्टफोन खरेदी केले जातात. पण जुना फोन विकून टाकणे हाही पर्याय असतोच. जुना फोन विकायचा असेल तर काही काळजी घेणे आवश्यक असते. तर फोन विकताना कुठली काळजी घ्यावी याची थोडक्यात माहिती येथे देत आहोत.

फोन विक्रीसाठी देताना प्रथम फॅक्ट्री रिसेट करायला हवी. त्यासाठी सेटिंग मध्ये जाऊन बॅकअप व रिसेट ऑप्शनवर जायचे आणि तेथे क्लिक करायचे. फोन मध्ये आपला काही खासगी डेटा असेल तर तो लिक होणार नाही. सेटिंग मध्ये जाऊन बॅकअप ऑप्शन वर क्लिक केले की खासगी डेटा गुगल ड्राईव्ह वर सेव्ह होतो.

फोन विकण्यास्ठी ओएलएक्स सारख्या साईटची मदत घेता येते. तेथे फोन साठी चांगली किंमत मिळू शकते पण त्यासाठी वेबसाईटवर नोंदणी करावी लागते. चार्जर, बॉक्स, बिल सह फोन विक्री केली तर तुमची इमेज चांगली राहते आणि फोनला चांगली किंमत मिळू शकते. गुगल आयडी डिलीट करायला विसरायचे नाही. त्यासाठी सेटिंग युजर अकौंट ऑप्शन रिमुव्ह वर क्लिक करावे लागते.