१० वर्षांनी चित्रपटात पुनरागमन करणार धूम गर्ल ईशा देओल

धूम गर्ल ईशा देओल १० वर्षाच्या गॅप नंतर पुन्हा बॉलीवूड मध्ये पुनरागमन करत आहे. सोमवारी तिने रामकमल मुखर्जी दिग्दर्शित, भरत इशा फिल्म बॅनर खाली ‘एक दुआ’ चित्रपटात झळकत असल्याचे जाहीर केले आहे. ईशा आणि तिचे पती भरत या चित्रपटाची निर्मिती करत आहेत.

ईशाने २०११ मध्ये टेल मी ओ खुदा या चित्रपटात भूमिका केली होती आणि त्यानंतर आजपर्यंत तिने एकही भूमिका केलेली नाही. २०१२ मध्ये तिचा विवाह झाला आणि आता तिला दोन मुली आहेत. चित्रपटात परत यायची नेहमीच इच्छा होती असे सांगून ईशा म्हणाली, आता मुली थोड्या मोठ्या झाल्या आहेत आणि काही चांगले प्रोजेक्ट आहेत. कॅमेऱ्या समोर येण्याची ही योग्य वेळ आहे. एक दुआ चित्रपटाची कथा आवडली आणि त्यात भूमिका करण्याबद्दल विचारणा झाली त्याला लगेच होकार दिला.

ईशा डिस्ने हॉटस्टार व्हीआयपी क्राईम ड्रामा सिरीज रुद्र, द एज ऑफ डार्कनेस मध्येही दिसणार आहे.