प्रसिद्ध जगनेत्यांच्या अश्या आहेत खाण्यापिण्याच्या आवडी
माणसाला जगण्यासाठी खाणे आवश्यक आहे आणि त्यासाठी अक्षरशः लाखो पदार्थ उपलब्ध आहेत. अर्थात प्रत्येकाच्या खाण्यापिण्याच्या आवडी वेगळ्या असतात. माणूस अगदी सामान्य असो वा प्रसिद्ध मान्यवर असो. प्रत्येकाला त्याच्या स्वतंत्र आवडी असतात. देशाच्या जबाबदाऱ्या सांभाळणारे नेते कामात फारच व्यस्त असतात पण त्यातही ते आपल्या खाण्यापिण्याच्या आवडी सांभाळत असतात. अश्याच काही प्रसिद्ध नेत्याच्या या आवडी विषयी जाणून घेणे मनोरंजक ठरेल.
जगाची महासत्ता म्हटल्या जाणाऱ्या अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन हे वयाने मोठे आहेत हे खरे असले तरी खाण्याचा विषय आला की त्यांच्यातील लहान मूल जागे होते. बायडेन यांना आईस्क्रीम अतिशय प्रिय आहे. आईक्रीम दिसले की ते स्वतःला कंट्रोल करू शकत नाहीत. आईस्क्रीम खाण्यातला आनंद त्यांच्या चेहऱ्यावर अगदी स्पष्ट वाचता येतो.
उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग उन याचे वजन खुपच वाढले होते. आता तो बराच बारीक दिसतो आहे आणि त्याबद्दल देशवासीय काळजीत आहेत अश्या बातम्या वाचनात आल्या असतीलच. त्याचे वजन कमी व्हावे म्हणून डॉक्टर्स त्याला डायट देतात आणि खाण्यावर नियंत्रण ठेवायचा सल्ला देतात. पण वाईन आणि पनीर दिसले की किम डॉक्टरचा सल्ला ढाब्यावर बसवून या दोन्ही पदार्थांचा मनसोक्त आस्वाद घेतो असे सांगतात. रशियाचे अध्यक्ष पुतीन हे फिटनेस बाबत फार जागरूक आहेत. रोजचा व्यायाम ते कधीच चुकवत नाहीत. फिटनेस राहावा म्हणून ते हलका, कमी फॅटचा आहार घेत असले तरी त्यांचा वीक पॉइंट आहे पिस्ता आईस्क्रीम.
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान याना नॉनव्हेज खाणे अधिक पसंत आहे त्यातही रोस्टेड चिकन आणि बिर्याणी. चीनचे राष्ट्रपती शी जीनपिंग सूप आणि भाज्यांचे शौकीन आहेत. ते नॉनव्हेज अधिक पसंत करतात. मांसाहारी सूप सोबत उकडलेल्या बिन्स, कांदा आणि अन्य भाज्या त्यांना आवडतात.
भारताचे पंतप्रधान मोदी हेही फिटनेस बाबत जागृत आहेत आणि दिवसाचे १८-२० तास काम करूनही त्यांच्या उत्साह कायम दिसतो. या मागचे रहस्य त्यांचे खाणे आणि योगा हे आहे. मोदी शाकाहारी आहेत. गुजराती खिचडी हे त्यांचे आवडते जेवण आहे. त्याचबरोबर खांडवी, ढोकळा हे गुजराथी पदार्थ त्यांना आवडतात. गोड पदार्थात त्यांना श्रीखंड प्रिय आहे. उपवास काळात मात्र ते फक्त गरम पाणी आणि लिंबू यावरचा दिवसभर असतात