देश आणि राज्यातील कोरोना परिस्थितीवरून संभाजी भिडे यांनी उपस्थित केली शंका


सांगली : शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी कोरोना म्हणजे थोतांड असून शासन हा थोतांड का वाढवत आहे, कळत नाही. पण हे सर्व देशात चाललेले षडयंत्र असल्याचे मत व्यक्त केले आहे. तसेच वारकर्‍यांनी पंढरपूरच्या वारीवर घेण्यात आलेल्या बंदीच्या बाबतीत विरोध करून रस्त्यावर उतरायला हवे होते आणि आजचे राज्यकर्तेही किमतीचे नसल्याचे संभाजी भिडे यांनी म्हटले आहे. संभाजी भिडे यांच्या वक्तव्यामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी देशातील आणि राज्यातील कोरोना परिस्थितीवरून शंका उपस्थित केली आहे. महाराष्ट्राला देशाच्या इस्लामिक स्वारांनी मातीत घातले. महाराष्ट्रात आज भगवंतांचे नामकरण करत वारीला जाण्यासाठी बंदी घालण्यात आली. कारण वारीमुळे कोरोना वाढू शकतो. पण कोरोना म्हणजे थोतांड आहे आणि हे सरकार हे थोतांड का वाढवत आहे हे कळत नसल्याचे संभाजी भिडेंनी म्हटले.

पण आज देशात या कोरोनामुळे काय घडले असेल, तर लोकांच्यामध्ये फक्त भीतीचे आणि घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. जर या वारीला बंदी घातली नसती, तर देशात एकही उदाहरण मिळाले नसते की कोरोनामुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. माझे मत आहे की कोरोना हे षड्यंत्र आहे. देशाचा हे दुर्दैव आहे, असे मत संभाजी भिडे यांनी व्यक्त केले आहे. तर पंढरपूरच्या वारीला बंदी घातल्यानंतर वारकर्‍यांनी रस्त्यावर उतरायला हवे होते, असेही त्यांनी म्हटले.