महाराष्ट्रातून संभाजी भिडे यांना तडीपार करा – सचिन खरात


मुंबई : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांना महाराष्ट्रातून तडीपार करावे, अशी मागणी केली. महाविकास आघाडी सरकार आल्यापासून संभाजी भिडे समाजव्यवस्था बिघडेल अशी वक्तव्य करत आहेत. त्याचबरोबर आता तर संभाजी भिडे म्हणतात कोरोना म्हणजे थोतांड आहे, मंदिराचे कुलूप तोडा आणि वारकऱ्यांनी रस्त्यावर उतरा. असे चिथावणीखोर वक्तव्य केल्यामुळे, त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा आणि त्यांना महाराष्ट्रातून तडीपार करावे, असे खरात म्हणाले.

संभाजी भिडे यांना तडीपार करण्याची मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्याकडे सचिन खरात यांनी केली आहे. आज सांगलीत बोलताना संभाजी भिडे यांनी कोरोना वगैरे सगळे थोतांड असल्याचे म्हटले होते. त्यावरुन सचिन खरात यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.