पाळत ठेवण्याच्या वक्तव्यावरुन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे घुमजाव


पुणे – प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लोणावळा येथील काँग्रेस कार्यकर्त्यांसमोर बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्यावर पाळत ठेवत असल्याचा गंभीर आरोप केला. या सनसनाटी आरोपानंतर महाविकासआघाडी सरकारमध्ये जोरदार वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान, नाना पटोले यांनी आपल्या वक्तव्यावरुन घुमजाव करत आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावत विपर्यास केल्याचे म्हटले आहे. आपला आरोप राज्य सरकार नव्हे तर केंद्र सरकारविरोधात आहे. आपण मुंबईत आल्यावर सविस्तर प्रतिक्रिया देणार असल्याचेही पटोले यांनी म्हटले आहे.

लोणावळा येथील केलेल्या वक्तव्यावरुन वाद निर्माण होण्याची चिन्हे असताना पटोले यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीवर स्पष्टीकरण दिले. पटोले यांनी या स्पष्टीकरणात म्हटले की, आपल्या वक्तव्याचा विपर्यास केला. माझे आरोप हे केंद्र सरकारवर होते. राज्य सरकारविरोधात नाही. राज्य सरकारविरोधात आपला कोणताही आरोप नाही. आपल्या वक्तव्याबाबत मुंबईला आल्यावर आपण सविस्तर स्पष्टीकरण देणार असल्याचेही नाना पटोले यांनी म्हटले आहे.