अभिनेते रजनीकांत यांचा राजकारणाला कायमचा रामराम


नवी दिल्ली – सुपरस्टार रजनीकांत यांनी राजकारणाला कायमचा रामराम केल्याची माहिती दिली आहे. त्याचबरोबर त्यांचा रजनी मक्कल मंद्रम हा पक्ष विसर्जित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. तसेच माझी भविष्यात राजकारणात येण्याची कोणतीच योजना नसल्याचेही रजनीकांत यांनी स्पष्ट केले आहे.

अभिनेते रजनीकांत याविषय़ी माहिती देताना म्हणाले की. रजनी मक्कल मंद्रम पक्ष विसर्जित करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला असून हा निर्णय फोरमच्या सदस्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर जाहीर करण्यात आला आहे. भविष्यात राजकारणात येण्याची माझी कोणतीच योजना नाही. रजनी मक्कल मंद्रम हा पक्ष विसर्जित होईल आणि त्याचे ‘रजनीकांत रासिगर नारपानी मंद्रम’ किंवा ‘रजनीकांत फॅन्स वेलफेअर फोरम’मध्ये रुपांतर करण्यात येईल.

त्यात राजकीय प्रवेशावरील अनेक प्रश्नांबाबत चर्चा केली जाईल. राजकारणात मी प्रवेश करावा की नाही यावर आम्ही चर्चा करू. कोरोना, निवडणुका, शूटिंग आणि अमेरिकेतील वैद्यकीय तपासणीमुळे याआधी मी कार्यकर्त्यांना भेटू शकलो नव्हतो, असे रंजनीकांत पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले आहेत.