आईच्या पोटातच गर्भाचा डीएनए बदलून चीन बनविणार सुपरसोल्जर

तंत्रज्ञानात चीनचा हात सहजासहजी कुणी ठरू शकणार नाही मग ते अभियांत्रिकी तंत्रज्ञान असो वा बायोलॉजिकल प्रयोग असोत. चीनचा असाच एक प्रयोग सध्या मोठ्या चर्चेत आला आहे. यात देशाची सैन्य ताकद वाढविण्यासाठी आईच्या पोटात असतानाचा गर्भाचा डीएनए बदलून त्यातून सुपर सोल्जर बनविले जाणार आहेत असे सांगितले जात आहे.

वास्तविक अतिशय खासगीरित्या गर्भवती महिलांच्या गर्भातील बाळांचा डीएनए डेटा जमाविण्याचे काम चीन मध्ये सुरु आहे. जिन करेक्शन करून त्यातून सेनेला सुपर सोल्जर मिळवून देण्याचा हा प्रयोग असल्याचे रॉयटरच्या बातमीत म्हटले गेले आहे. चीनी पेरेंटल कंपनी बीजीआय ग्रुप व चीन पीपुल्स लिबरेशन आर्मी यासाठी एकत्र काम करत आहेत. बीजीआयच्या ग्रुप अध्ययनात ब्रेन सर्जरीच्या माध्यमातून अति उंचावर तैनात सैनिक सुरक्षेसाठी जीन्स व औषधाची चर्चा केली जात आहे. मात्र यासाठी बीजीआयच्या माध्यमातून चीन जगाच्या अनेक देशातील गर्भवती महिलांच्या पोटातील बाळांचा जेनेटिक डेटा जमा करत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार ५० पेक्षा अधिक देशात बीजीआय ग्रुप पेरेंटल टेस्ट सेवा देतो. सैनिकांना गंभीर आजार होऊ नयेत यासाठी त्यांच्या जिन्स म्हणजे जनुकात बदल करण्याचे प्रयोग सुरु असल्याचे चीन कडून सांगितले जात असले तरी त्यावर कुणीही विश्वास ठेवलेला नाही. गर्भातच डीएनए बदल करून जिगरबाज सैनिक जन्माला घालण्याचा हा डाव असल्याची शंका व्यक्त होत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी बीजीआय ग्रुपच्या सहकार्याने जगभरातील महिलांच्या गर्भातील बालकांच्या जीन्सच्या डेटाचा अभ्यास करण्याचा सर्वाधिक फायदा चीन, सैनिक आणि आर्थिक पातळीवर करून घेण्याचा मोठा धोका असल्याचा इशारा दिला आहे.

या प्रयोगातून चीनी फार्मा जागतिक फार्मा उद्योगावर कब्जा करेल अशीही भीती व्यक्त होत आहे. चीन विविध देशातील ८० लाख गर्भवती महिलांचे अध्ययन करत असल्याचा संशय असून बीजीआयने फक्त चीनी महिलांवर अध्ययन सुरु असल्याचे म्हटले आहे.

गेल्या १ वर्षात भारत चीन सीमा भागात चीनी सैनिक मोठ्या प्रमाणावर आजारी पडत असल्याच्या केसेस झाल्या आहेत. यामुळे सैनिक क्षमता वाढविण्यासाठी चीन अनेक प्रयोग करत आहे.