दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाखोंचा फायदा


वाद-विवाद हे कुणापासून सुटले आहेत असे शोधून देखील सापडणार नाहीत. काही वाद हे चर्चा करुन देखील मिटवले जातात. पण काही वाद टोकाला जाऊन पोहचतात याचे उदाहरण देखील आपण पाहिले आहे. पण तुम्ही कधी असे ऐकले आहे का दोघांचे भांडण आणि तिसऱ्याचा लाखोंचा फायदा झाल्याचे? पण असे काही सत्यात घडले आहे. बॉयफ्रेन्ड-गर्लफ्रेन्डचे फ्लोरिडातील एका क्लीअर स्काय कॅफेमध्ये भांडण झाले आणि तरूणीने भांडणाच्या तावातावात हॉटेलमध्ये ३ लाख ४३ रूपयांची चक्क टीप दिली आणि ती टीप सुद्धा तिने तिच्या बॉयफ्रेन्डच्या क्रेडीट कार्डने दिली.

सेरीना असे तरूणीचे नाव असून तिच्या बॉयफ्रेन्डसोबत ती वाद घालत होती. त्यांच्यात न्यूयॉर्कला घरी जाण्यासाठी प्लेनचे तिकीट खरेदी करून दे, यावरून हा वाद सुरू होता. पण यासाठी सेरीनाच्या बॉयफ्रेन्डने नकार दिला. त्यावरुन या दोघांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. सेरीनाने त्याच्या नकाराचा बदला घेण्यासाठी नंतर रागारागात हॉटेलमध्ये ५ हजार डॉलरची टीप दिली. पण केवळ ५५ डॉलर एवढेच त्यांचे बील झाले होते. भारतीय चलनानुसार त्यांचे बिल ३७०० रूपये एवढे झाले होते.

सेरीनाला या प्रकरणी पोलिसांनी अटकही केली. बॉयफ्रेन्डने सांगितले की, सेरीनाने अतिप्रमाणात मद्यसेवन केले होते. ती सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. क्रेडीट कार्ड ज्या व्यक्तीचे आहे, त्याच्या परवानगीशिवाय त्याचा वापर करणे हा येथे गुन्हा मानला जातो आणि तो गुन्हा तिने केल्यामुळे सेरीनाला १ हजार डॉलरचा दंडही भरावा लागणार आहे.

Leave a Comment