तब्बल 1300 वर्षांपासून या लोकांनी जमिनीवर ठेवले नाही पाय


साधारणता प्रत्येक जण हे आपले घर जमिनीवरच बांधत असतो. मात्र तुम्हाला माहिती आहे का ? असेही काही लोक आहेत ज्यांनी तब्बल 1300 वर्षांपासून जमिनीवर पाय देखील ठेवलेला नाही. यामागचे कारण ऐकून तुम्ही देखील आश्चर्यचकित व्हाल.

टंका असे या जमातीचे नाव असून, ते चीनमध्ये राहतात. येथील लोक जमिनीवर पेक्षा समुद्रात राहणे पसंत करतात. पाणीच यांचे जग असून, तब्बल 7 हजार लोकांनी समुद्रावरच तरंगणारे गाव वसवले आहे. चीनच्या दक्षिण पुर्व भागात जवळपास 7 हजार मच्छिमारांचे कुटूंब पारंपारिक नावेतील घरातच राहत आहेत. ही घरं नावेत असून, ती समुद्रात तरंगतात. या मच्छिमारांना ‘जिप्सीज ऑफ द सी’ या नावाने देखील ओळखले जाते.

चीनमध्ये 7व्या शतकात तांग राजवंशचे शासन होते. तेव्हा ही लोक युध्दापासून वाचण्यासाठी समुद्रातील नावेत राहू लागले. तेव्हापासूनच यांना ‘जिप्सीज ऑफ द सी’ या नावाने देखील ओळखले जाते. कधीतरीच ही लोक जमिनीवर पाय ठेवतात. 7 व्या शतकापासून आजपर्यंत ही लोक पिढ्यांपिढ्या समुद्रावरच घर बनवून राहत आहेत. टंका जमातीच्या या लोकांचे संपुर्ण आयुष्य पाण्यातील घर आणि मच्छिमारी यामध्येच निघून जाते. चीनमध्ये कम्युनिस्ट सरकार येण्याआधी तर हे लोक जमिनीवर देखील येत नसे. याशिवाय जमिनीवरील लोकांशी लग्न देखील करत नाहीत. आजही त्यांचे लग्न नावेवरच होते.

स्थानिक सरकारद्वार प्रोत्साहन देण्यात आल्यानंतर टंका जमातीतील काही लोकांनी आता समुद्र किनारी घरे बांधण्यास सुरूवात केली आहे. मात्र अद्याप मोठ्या प्रमाणात पारंपारिक पध्दतीने नावेवरील घरात राहणेच पसंद करतात.

Leave a Comment