येथे आहे जगातील पहिले तरंगणारे डेअरी फार्म


नेदरलँडच्या रोटरडम येथे जगातील पहिलेवहिले तरंगणारे दोन मजली डेअरी फार्म सुरू करण्यात आले आहे. बंदरावर बांधण्यात आलेल्या या फार्मवर 40 गाई पाळल्या जाऊ शकतात. आता येथे 35 गाई पाळण्यात आल्या असून, या गाईंपासून दररोज 800 लीटर दुधाचे उत्पादन केले जाते. याशिवाय दुध काढण्यासाठी रोबोट ठेवण्यात आलेले आहेत. या फार्मला डच कंपनी बेलाडोन यांनी बनवले असून, शहरातील दुधाची आवक वाढवण्यासाठी हे फार्म सुरू करण्यात आले आहे.

हे फार्म बंदरावर बनवण्यात आले असल्याने वस्तू लोकांपर्यंत सहज पोहचवता येत आहे. संयुक्त राष्ट्राचे फूड आणि एग्रीकल्चर ऑर्गनायझेशनचे प्रमुख डॉ. फेंटन बीड यांनी हे फार्म उत्कृष्ट असल्याचे सांगितले आहे. ते म्हणाले की, शहरातील फार्ममध्ये कमी पाणी, फर्टिलाइजर आणि पेस्टीसाइडचा वापर करण्यात येत असतो.

या फार्मचे जनरल मॅनेजर अल्बर्ट बेरसन यांनी सांगितले की, या गाईंचे खाद्य हे रोटरडममधील फूड कंपन्यातून निघणाऱ्या वस्तूच आहेत. बेवअरेज, रेस्टॉरंट आणि कॅफे यांच्याकडून देखील मदत घेतली जात आहे. सोलर पॅनलच्या मदतीने फार्मसाठी लागणारी वीज तयार होते. फार्ममधून निघणाऱ्या शेणाचा वापर खत आणि गॅस बनवण्यासाठी केला जातो.

Leave a Comment