या हॉटेलमध्ये गर्लफ्रेंडसाठी आहे खास मेन्यू


अनेक वेळा लोक मस्करीमध्ये म्हणत असतात की, त्यांच्या गर्लफ्रेंडला भुक लागल्यावर ती फ्रिज किंवा किचनमध्ये ठेवलेले सारे जेवण चाटून-पुसून खाते. याच गोष्टीला लक्षात घेऊन एका हॉटेलने गर्लफ्रेंडसाठी स्पेशल मेन्यूची सोय केली आहे. त्या मेन्यूचे नाव ठेवण्यात आले आहे ‘माय गर्लफ्रेड इज नॉट हंगरी’. म्हणजेच माझ्या गर्लफ्रेंडला भूक नाही.

फिलाडेल्फिया येथील एका हॉटेलने ग्राहकांचे ध्यान आक्रर्षित करण्यासाठी मेन्यूमध्ये ‘माय गर्लफ्रेड इज नॉट हंगरी’ असा पर्याय दिला आहे. या नावाचा मेन्यू ऐकून कदाचित तुम्हाला विचित्र वाटेल. मात्र या मेन्यूचा स्वाद तुमच्या तोडांची चवच बदलून टाकेल.

‘माय गर्लफ्रेड इज नॉट हंगरी’ हा पदार्थ खाण्यासाठी या हॉटेलच्या बाहेर दररोज शेकडो लोकांची रांग लागलेली असते. जर तुम्ही तुमच्या गर्लफ्रेंडबरोबर या हॉटेलमध्ये जाऊन हा मेन्यू निवडाल तर तुम्हाला त्याबरोबर एक्स्ट्रा फ्रेंच फ्राइज, चिकन विंग्स आणि फ्राइज चीज स्टिक्स देखील देण्यात येते.

‘माय गर्लफ्रेड इज नॉट हंगरी’ याची किमंत देखील अतिशय कमी आहे. हे 300 रूपयांपेक्षा कमी किंमतीत उपलब्ध आहे.

Leave a Comment