हा पठ्ठा चक्क बिअरच्या कॅनपासून बनवतो खेळणी


बीजिंग – विविध प्रकारचे छंद आपल्यापैकी बऱ्याच जणांना असतात. पण या छंदाचे व्यवसायात रूपांतर करणारे कमी असतात. काेल्ड्रिंक, बिअर आणि विविध पेयांच्या रिकाम्या कॅनपासून चीनच्या हेनान प्रांतातील ल्युओनिंग शहरातला दाई चेंगलिन हा शेतकरी सुंदर खेळणी करतात. ५ रुपयांत चेंगलिन कॅन खरेदी करतात. त्यापासून खेळणी बनवून ५ हजार रुपयांत विकतात. गेल्या काही वर्षांत त्यांनी माेटार आणि विमानांच्या ८हजार पेक्षा जास्त प्रतिकृती बनवल्या आहेत.

Leave a Comment