600 वर्षांपूर्वीचा हा पुल टिकला आहे गवतापासून बनवलेल्या दोरखंडावर


सध्याच्या घडीला तंत्रज्ञान क्षेत्र किती पुढे गेले आहेत याची उदाहरणे आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहतच असतो. पण आताच्या युगापेक्षा यापूर्वीचे युग देखील खूप पुढे होते याचे उदाहरण नुकतेच पाहायला मिळत आहे. आम्ही आज तुम्हाला अशाच एका पुलाबाबत सांगणार आहोत. ज्याकाळी इंजिनिअर असतील किंवा नसतील याबाबत काही माहित नाही. चला तर मग जाणून घेऊया त्या पूलाबाबत…

पेरु देशातील कुस्को परिसरातील अपुरीमॅक नदीवर हा पूल बांधण्यात आला आहे, जो चक्क गवतापासून बनलेल्या दोरखंडापासून बनवण्यात आला आहे. या पुलाची (q’eswachaka) दरवर्षी दुरुस्ती केली जाते. या जागी दरवर्षी गवतापासून बनलेल्या रश्श्यांच्या वापर करून जुन्या पुलाच्या जागी नवीन पुलाची उभारणी केली जाते. हा पूल इंका रोप ब्रीज या नावाने देखील ओळखला जातो. विशेष म्हणजे गेल्या 600 वर्षांपासून हा पूल लोकांच्या वाहतूकीचे साधन बनला आहे.

या तंत्रज्ञानाचा वापर इंका साम्राज्यात पूल बांधण्यासाठी केला जात होता. येथील परंपरेनुसार हा पूल बनविण्याचा केवळ पुरुषांनाच अधिकार होता. नदीकिनारी बसून महिला केवळ लहान-लहान दोऱ्या बनवितात. जाड दोरखंडाचा वापर करुन हवेत लटकणाऱ्या या पुलास हातांनीच गुंफले जाते. युनेस्कोने 2013 मध्ये यास जागतिक मान्यतेच्या रुपात घोषित केले आहे. नवीन पुलांची निर्मित्ती या पुलाच्या बांधणीवरुन करण्यात येत आहे.

पूलबांधणीचा हा दोरखंड बनविण्यासाठी पुलाच्या दोन्ही बाजुंचे पुरुष कारागिर एकत्र येऊन गवतापासून हा दोरखंड बनवतात. पूल बनिवण्याच्या पहिल्याच दिवशी कामावर येणारे पुरुष लहान दोऱ्यांच्या सहाय्याने मोठा दोरखंड बनवितात. 6 मोठ्या दोरखंडांपासून प्रमुख पूल हा बनविला जातो.

कोया इचू नामक विशिष्ट वनस्पतीचे गवत हा पूल बनिवण्यासाठी वापरण्यात येते. त्यास अगोदर दगडांनी ठेचून आणि नंतर पाण्यात भिजवून घेतले जाते. त्यास आपण काथ्या असेही म्हणतो. कुठल्याही आधुनिक यंत्रसामुग्राची किंवा मशिनचा वापर हा पूल बनिवण्यासाठी करण्यात येत नाही.

Leave a Comment