पावसाळ्यात मेकअप करताना अशी घ्या काळजी


पाउस अनेकांना हवाहवासा वाटतो कारण तो असह्य उकाड्यापासून सुटका देतो. मात्र पावसाने चिपचिप वाढते. या दिवसात अनेक सणउत्सव येतात, लग्न मुहूर्त असतात त्यामुळे मेकअप करून साजरे दिसण्यात अडचण निर्माण होऊ शकते. पण त्यावर पावसाळ्यात मेकअप करताना काही पथ्ये पाळली तर या दिवसात सुद्धा सुंदर दिसण्यास आडकाठी होत नाही. त्यासाठी काही काळजी घ्यायला हवी.


पहिले म्हणजे या दिवसात मेकअप करण्याची गरज असेल तेव्हा वॉटरप्रुफ मेकअप हवा. त्यामुळे तशी उत्पादने खरेदी करावीत. टू वे कॉम्पॅक्ट पावडर आणि फाउंडेशनचा वापर करता येईल. थोड्याश्या ओल्या स्पंजचा वापर त्यासाठी करावा किंवा ड्राय पावडर म्हणूनही त्याचा वापर करता येतो.

लिपस्टिक लावण्यापूर्वी ओठावर वॉटरप्रुफ लायनरचे दोन कोट द्यावेत आणि त्यानंतर वॉटरप्रुफ लीपकलर लावावे म्हणजे पावसात भिजले तरी शेड ओघळणार नाही. मेकअप सामान खरेदी करताना ते वॉटरप्रुफ आहेत का आणि त्याचा परिणाम किती काळ राहील हे अगोदर जाणून घ्यावे.


पावसाळ्यात पावडर ब्लश ऐवजी क्रीम ब्लशचा वापर करावा. ते गालावर अधिक काळ राहील. कलर थोडा गडद हवा असेल तर त्यावर पावडर ब्लश लावावा. या काळात टोनरचा वापर आवश्यक आहे. तो स्कीन स्वच्छ ठेवेल, त्वचेची आर्द्रता राखेल आणि त्वचेची छिद्रे बंद होऊन पीएच बॅलन्स राखला जाईल.आय मेकअप करताना तो ब्राईट असुदे पण गुलाबी अथवा पीच लाईट शेड त्यासाठी निवडा. ओठांसाठी ग्लॉस किंवा मॅट लिपस्टिक वापरा.


डोळ्यांसाठी पावसाळ्यात कोल काजळ नको. डोळे त्यामुळे सुंदर दिसले तरी पावसात त्याचा उपयोग नाही. लिक्विड फाउंडेशन टाळा त्याऐवजी ऑइल फ्री फौंडेशनचा विचार करा. क्रीम बेस्ड कन्सोल नको. त्याऐवजी पिंपल्स, डार्क सर्कल लपविण्यासाठी क्रेयोन कंसोलर वापरा. या दिवसात केस चिकट होतात त्यामुळे ते कोरडे आणि नॅचरली जसे आहेत तसेच राहूद्या. ऑइली स्कीन प्रोडक्ट्सचा वापर टाळा.

लीप कलर मध्ये जादा शायनी, एक्स्ट्रा ग्लॉसी नको, आयशॅडोचा वापर नको. त्याऐवजी वॉटरप्रुफ आयलायनर चालेल.

Leave a Comment