तेजस्वी यादवांची विरोधकांना एकत्र येण्याची हाक


पटना – सध्याच्या घडीला देशातील लोक प्रचंड त्रासातून जात आहेत. लवकरात लवकर हे सरकार जावे, अशी लोकांची इच्छा आहे. भाजपला ज्यांनी मतदान केले, ते सुद्धा भाजपला मत देऊन चूक केल्याचे मान्य करत असल्याचे निरीक्षणे नोंदवत राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी विरोधकांना एकजूट होण्याचे आवाहन केले आहे. लोक चूक मान्य करत असले, तरी देशाला राजकीय पर्याय उपलब्ध करून देणे हे आपले कर्तव्य असल्याचे म्हणत तेजस्वी यादवांनी विरोधकांना एकत्र येण्याची हाक दिली.

तेजस्वी यादव पुढे म्हणाले लवकरच काहीतरी निर्माण व्हायला हवे, असे मला वाटते. विरोधी पक्षातील नेत्यांनी एकत्र बसावे आणि बोलावे, असे मला वाटतं. जेव्हा मला कुणीतरी विचारते, तेव्हा मी हेच सांगतो की, ती वेळ आली आहे आणि विरोधकांनी शक्य तितक्या लवकर एकमेकांशी बोलायला हवे. एवढेच नाही, तर आपला पराभव ज्या दिवशी झाला, त्या दिवसापासूनच आपण बोलणे सुरू करायला हवे होते, असे आवाहन तेजस्वी यादव यांनी केले आहे.

लोकांपर्यंत विरोधकांनी सातत्याने पोहोचायला हवे. आम्ही (राजद) बिहारपुरते मर्यादित आहोत. कुणीतरी बंगाल पुरते, तर कुणी महाराष्ट्रापुरते मर्यादित आहे असल्यामुळे आपल्याला एकत्र यावे लागेल आणि प्रत्येक राज्यात जावे लागेल. प्रत्येक राज्यात जाऊन काय समस्या आहेत, हे लोकांना सांगावे लागेल. असे सगळे सुरू आहे. त्यांनी (भाजप) अमूक आश्वासने दिली होती, त्यांनी ती अजून पूर्ण केलेली नाही, हे लोकांना सांगावे लागेल, अशी भूमिका तेजस्वी यादव यांनी यावेळी मांडली.

सर्व विरोधकांना एकत्र येऊन समस्या लोकांच्या निदर्शनास आणून द्यावा लागलील, त्यांची मन वळवावी लागतील. आम्ही जर लोकांची मन वळवू शकत नसू, तर मग कुठेतरी चूक होत आहे. कदाचित आमच्या एकी दिसत नसेल. आम्हाला आमच्यातील मतभेद आणि इगो काढून टाकावे लागतील. जिंकल्यानंतर काय हा विचार बाजूला ठेवावा लागेल.

जर देश राहिला, तरच कुणीतरी नेता होईल. पण भाजप खूप काळ सत्तेत राहिले, तर देशात काहीच शिल्लक राहणार नाही. कोणत्याही प्रादेशिक पक्षाला आघाडीसाठी मी जबरदस्ती करू शकत नाही. जे एकत्र येण्यास आहेत. पण एक गोष्ट अशी आहे की, जेव्हा केव्हा भविष्यात इतिहास वाचला जाईल, तेव्हा लोक आपल्याला कधीच माफ करणार नाही, अशी भीती तेजस्वी यादव यांनी व्यक्त केली.

तेजस्वी यादव काँग्रेसविषयी बोलताना म्हणाले, काँग्रेसमध्ये अंतर्गत समस्या आहे की नाही; पण त्या समस्या तो पक्षच सोडवू शकतो. काँग्रेसला आणखी मजबूत होऊन बाहेर पडावे लागेल. काँग्रेसची २०० जागावर थेट भाजपशी आहे. त्या जागांवर त्यांनी लक्ष केंद्रीत केले पाहिजे. उशीर करून काहीच मिळणार नाही. मैदानात उतरावे लागेल. हे कोरोनामुळे किती शक्य होईल माहिती नाही आणि भाजप काय करेल, पण विरोधकांना आता एक योजना बनवावी लागेल. सरकारला कसे लक्ष्य करता येईल, यासाठी योजना असायला हवी.

लोक खूप अडचणीमध्ये आहेत. लवकरात लवकर हे सरकार जावे अशी जनतेची इच्छा आहे. भाजपला ज्यांनी मतदान केले, तेही आता भाजपला मत देऊन चूक झाल्याचे कबूल करत आहेत. आता विरोधकांची जबाबदारी आहे की, मतभेद, अंहकार आणि वैयक्तिक महत्त्वकांक्षा बाजूला ठेवून एकत्र यायला हवे. देश आणि संविधान वाचवण्यासाठी काही कठोर पावले विरोधकांनी टाकण्याची वेळ आली असल्याचे मत तेजस्वी यादव यांनी मांडले.