डॉज आणणार फुलचार्ज मध्ये ८०० किमी धावणारी इव्ही

जगभर पॉवरफुल व आयकॉनिक कार्सच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध डॉज कंपनी पॉवरफुल इलेक्ट्रिक कार बाजारात उतरविण्याच्या दृष्टीने पावले टाकत आहे. त्यांची पहिली इलेक्ट्रिक मसल कार २०२४ मध्ये बाजारात येईल असे सांगितले जात आहे. डॉजची मूळ कंपनी स्टेलांटीस ने एका कार्यक्रमात ही घोषणा केली आहे.

डॉज इव्ही ई मसल एका फुल चार्ज मध्ये ५०० मैल म्हणजे ८०० किमी पेक्षा जास्त अंतर कापू शकणार आहे. कंपनीकडे चार पूर्ण इव्ही समर्पित प्लॅटफॉर्म तयार आहेत. इलेक्ट्रिक मसल एसटीएलए लार्ज प्लॅटफॉर्मवर तयार होणार आहे. तिला FRATZOG लोगो असेल. ६० ते ७० च्या दशकात डॉज कार्सच्या ग्रीलवर हा लोगो होता. इलेक्ट्रिक कार निर्मितीने नवे मसल कार युग सुरु होईल असा दावा कंपनीने केला आहे. मात्र या नव्या इलेक्ट्रिक कार बाबत सविस्तर माहिती अजून जाहीर केली गेलेली नाही.