आता करोनाचे कप्पा व्हेरीयंट वाढवितेय चिंता
भारतात करोनाची दुसरी लाट येण्यास कारणीभूत ठरलेल्या डेल्टा व्हेरीयंटचा अधिक उग्र अवतार डेल्टा प्लस अजूनही अस्तित्वात असतानाच करोनाचे नवे कप्पा व्हेरीयंट चिंतेत भर घालू लागले आहे. उत्तर प्रदेशात संत कबीर नगर मध्ये दोन करोना संक्रमितात कप्पा व्हेरीयंट सापडले आहे. करोना तज्ञ या संक्रमितांची ट्रॅव्हल हिस्ट्री शोधून काढत आहेत. कप्पा सुद्धा डेल्टा प्लस प्रमाणेच खतरनाक असल्याचे सांगितले जात आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने करोना स्ट्रेन च्या नावाना ग्रीक अल्फाबेटीकल लेबल्स दिली असून डेल्टा, डेल्टा प्लस, कप्पा हे त्याचेच भाग आहेत. डेल्टा प्लस बी १.६१७.२ स्ट्रेन आहे तर कप्पा बी १.६१७.१ स्ट्रेन आहे. याची ओळख गेल्यावर्षीच झाली आहे. यात सुद्धा खोकला, ताप, घसा खवखव, स्वाद नसणे, श्वास घेण्यास त्रास अशीच लक्षणे रुग्णात दिसतात. अनेकदा ही लक्षणे दिसत नाहीत मात्र व्यक्ती संक्रमित असू शकते. त्यामुळे अशी लक्षणे अगदी थोड्या प्रमाणात दिसली तरी त्वरित डॉक्टर सल्ला घेणे आवश्यक असल्याचा सल्ला दिला गेला आहे. डेल्टा प्रमाणेच याचाही फैलाव अतिशय वेगाने होतो.