फेरारीची ‘Roma’ भारतात लॉन्च; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स


आपली नवीन कार रोमा (Roma) भारतात स्पोर्ट्स कार निर्माता कंपनी फेरारीने (Ferrari) लॉन्च केली आहे. 1950-60 च्या दशकाच्या रोम शहराच्या स्मरणार्थ फेरारीची ही नवी कार बनवण्यात आली आहे. कंपनीने नव्या कारमध्ये अॅडव्हान्स टेक्नॉलॉजीसह अनेक बदल केले आहे.

Roma च्या इंजिनविषयी बोलायचे तर अंत्यत पॉवरफूल इंजिन आहे. 8 स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन गिअरबॉक्स, 3.9 लिटर टर्बोचार्ज्ड V8 इंजिन देण्यात आले आहे. या इंजिनमधून 612 bhp ची पॉवर आणि 760 Nm पीक टॉर्क जनरेट होते. वेगासाठी प्रसिद्ध असलेल्या फेरारीची ही कार अवघ्या 3.4 सेकंदात 0 ते 100 किमी प्रति तास वेग पकडते. तर 200 किमी/ताससाठी केवळ 9.3 सेकंद लागतात. गाडीच्या टॉप स्पीड बद्दल बोलायचे झाले तर तो 320 किमी आहे.

फेरारी रोमाच्या बाहेरील फीचर्सबद्दल सांगायचे झाले, तर स्लोपिंग रुफलाईन, मोठे मस्कूलर हू़ड, रुंद एअर वेंट, समोरच्या बाजून मोठा स्प्लिटर आणि एलईडी डीआरएलसह स्लिम एलईडी हेडलॅम्पसह गाडीला मॉडिफाय करण्यात आले आहे. कारच्या मागील बाजूला क्वॉड एलईडी प्लेट्स, चार एग्झॉस्ट टिप आणि तीन सेटिंग्जसह लो ड्रॅग, मीडियम डाउनफोर्स आणि हाय डाऊनफोर्ससह एक स्पॉयलर यासारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

फेरारी रोमाला फ्लोटिंग सेंटर कन्सोलसह दोन सीटर केबिन दिली गेली आहे. थ्री-स्पोक फ्लॅट बॉटम स्टीअरिंग व्हीलसोबत 16 इंचाचा मोठा डिजिटल इंस्ट्रुमेंट क्लस्टर आहे. सेफ्टीसाठी गाडीत ABS, EBS आणि क्रॅश सेंसर प्रमाणे अनेक अॅडव्हान्स फीचर्स देण्यात आले आहेत.

आता फेरारीची कार म्हटले तर नावाप्रमाणे किंमतही मोठीच असणार आहे. फेरारी रोमा कारची एक्स-शोरुम किंमत 3.76 कोटी रुपये आहे.