चला ‘डीप ड्राईव्ह दुबई’ ला भेट द्यायला

जगात अनेक देशात विविध प्रकारचे जलतरण तलाव आहेत. त्यातील काही आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध ही आहेत. काही भव्य, काही सुंदर, काही हटके असे विविध प्रकार त्यात आहेत. पण गल्फ न्यूजच्या बातमी प्रमाणे जगातील सर्वात खोल आणि पाण्याखाली हॉटेल, रुम्स, दुकाने, अपार्टमेंट असलेला स्वीमिंग पूल दुबई मध्ये तयार झाला असून त्याचे नामकरण ‘डीप ड्राईव्ह दुबई’ असे केले गेले आहे. जुलै अखेरी हा अनोखा स्वीमिंग पूल खुला होत आहे. जगातील सर्वात खोल पूल अशी त्यांची नोंद गिनीज बुक मध्ये घेतली गेली आहे. क्राऊन प्रिन्स शेख हमदान बिन मोहम्मद बिन रशी अल मक्तूम यांनी नुकतेच या पूलचे उद्घाटन केले.

हा पूल ६०.०२ मीटर खोलीचा असून त्यात १ कोटी ४० लाख लिटर पाणी आहे. ऑलिम्पिक साईजच्या ६ पुलांइतकी त्याची क्षमता असून ‘डीप ड्राईव्ह दुबई’ १५०० चौरस मीटर आकाराचा आहे. येथील पाण्याचे तापमान ३० अंशावर मेंटेन केले गेले आहे. डायविंग करून आत जाताच एक दुकान, गिफ्ट शॉप, रेस्टॉरंट, दोन रुम्स आहेत. सहा व २१ मीटर खोलीवर दोन कोरड्या रुम्स आहेत. म्हणजे येथे पाणी नाही. या पूल मधील पाणी दर सहा तासानी फिल्टर केले जात असून नासाच्या फिल्टर तंत्रज्ञान व अल्ट्रा व्हायोलेट रेज त्यासाठी वापरले जात आहेत.

क्राऊन प्रिन्सनी बुधवारी या पूलचा व्हिडीओ शेअर केला असून ‘डीप ड्राईव्ह दुबई’ मध्ये एक अनोखे जग तुमची प्रतीक्षा करत आहे असे म्हटले आहे. हे फोटो व्हायरल झाले आहेत. जुलै अखेर या पूलचे बुकिंग सुरु होत आहे.