कॅबिनेट मंत्री ज्योतिरादित्य यांचे फेसबुक अकौंट हॅक

मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रीपद आणि नागरी उड्डाण मंत्रालायची जबाबदारी मिळून काही तास उलटत नाहीत तोपर्यंत ज्योतिरादित्य सिंधिया यांचे फेसबुक अकौंट हॅक करण्यात आल्याची घटना बुधवारी रात्री बाराच्या नंतर घडली. यात ज्योतिरादित्य यांच्या फेसबुक वॉलवरून पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात सिंदिया यांनी पूर्वी केलेल्या आक्रमक भाषणांचे व्हिडीओ अपलोड केले गेले. यात जोतीरादित्य मोदी सरकार कसे अपयशी ठरले ते सांगताना दिसत आहेत.

जे व्हीडीओ सिंदिया यांच्या अकौंट वर अपलोड केले गेले आहेत ते ज्योतिरादित्य कॉंग्रेस मध्ये असतानाचे आहेत. हे व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाले मात्र सायबर सेलला त्या संदर्भात माहिती मिळताच काही मिनिटात हॅकिंग ब्रेक करून अपलोड केलेले व्हिडीओ हटविले गेले. सायबर सेल अधिकाऱ्यांनी हॅकर्सने डेटा मध्ये केलेला फेरफार रिकव्हर केला गेल्याचे सांगितले. फेसबुक अकौंट हॅक झाल्यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

सायबर टीम महत्वाच्या युजर अकौंटवर क्षणोक्षणी नजर ठेऊन असते त्यामुळे हॅकिंग झाल्याबरोबर तत्काळ सायबर तज्ञांनी हालचाल सुरु करून काही मिनिटात हॅकिंग रोखले असे समजते.