कावेबाज, धूर्त चीनबाबत काही रोचक गोष्टी

आपला शेजारी चीन हा जगभर करोनामुळे सर्व देशांच्या काळ्या यादीत गेलेला देश. या देशाची प्रतिमा धूर्त, कावेबाज, दगाबाज अशी आहे. मात्र प्राचीन परंपरा लाभलेल्या या देशाच्या काही रोचक गोष्टी सुद्धा आहेत ज्याबाबत आपल्याला फारशी माहिती नाही.

सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे चीनी श्रीमंत जर एखाद्या गुन्हात दोषी ठरला आणि त्याला तुरुंगवास शिक्षा झाली तर असे श्रीमंत स्वतः ऐवजी दुसऱ्या व्यक्तीला तुरुंगात पाठवू शकतात. त्यासाठी त्या व्यक्तीला पैसे मोजले जातात. चीनी लोकांची खरेदी क्षमता प्रचंड म्हणजे अमेरिकेपेक्षा अधिक आहे. त्या अर्थाने चीन सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेला देश मानता येतो. जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात जायंट पांडा दिसला तर डोळे मिटून त्यावर चीनचा अधिकार आहे हे सांगता येते. ही प्रजाती चीनने लीज वर घेतलेली आहे. पिलांवर सुद्धा चीनचा हक्क आहे.

चीनच्या अनेक भागात गगनचुंबी इमारती आहेत आणि तेथे कुणीही राहत नाही. तरीही नवी बांधकामे सुरूच आहेत. पुढच्या २० वर्षात दरवर्षी २० शहरे वसविण्याचे लक्ष्य चीनने ठेवले आहे मात्र तेथे राहणार कोण याचे कोणतेही प्लॅनिंग केलेले नाही. त्यामुळे आत्ताच अनेक शहरे घोस्ट सिटी म्हणून ओळखली जात आहेत. चीन मध्ये आत्महत्या करणाऱ्यांचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे येथे ‘बॉडी फिशर’ पदावर नोकरी मिळू शकते. त्यांचे काम नदीतून आलेल्या डेड बॉडी बाहेर काढणे हे असते. चीन मध्ये लहान मुलांना डायपर्स न वापरता विशेष पद्धतीने शिवलेल्या पँट वापरल्या जातात. त्याला बॉटम मध्ये छेद असतो आणि त्यातूनच पॉटी केली जाते.

चीन मध्ये तब्बल १० दिवसांचा जॅम म्हणजे वाहतूक कोंडी झाल्याची घटना ऑगस्ट २०१० मध्ये घडली. बीजिंग मंगोलिया रस्त्यावर वाहनांच्या ६० मैल लांबीच्या रांगा लागल्या होत्या. चीनच्या सीमा अनेक देशांशी जोडल्या गेल्या आहेत. चीनच्या सीमा १४ देशांशी जोडलेल्या आहेत. म्हणजे चीनला १४ शेजारी देश आहेत. भारताप्रमाणेच चीन मध्ये शोक व्यक्त करताना पांढऱ्या रंगाचे कपडे वापरले जातात. अंत्यसंस्कारात उपस्थित राहताना पांढरे रोब घातले जातात. चीन मध्ये चिमणीच्या घरट्यापासून बनविलेले सूप अत्यंत लोकप्रिय पदार्थ आहे. त्याला प्रचंड मागणी आहे. ‘ईटेबल बर्ड नेस्ट सूप किंवा स्विफ्टलेट सूप’ असे त्याला म्हटले जाते. या सूपसाठी वापरली जाणारी घरटी किलोला दीड लाख रुपये दराने विकली जातात.

जगभर लांब नखे हे महिलांच्या सौंदर्याचे लक्षण मानले जाते तसे ते चीन मध्येही आहे. पण येथे पुरुष सुद्धा लांब नखे वाढवितात. ते संपन्नतेचे प्रतिक मानले जाते.