डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे बी.कॉमचे ते 11 हजार विद्यार्थी उत्तीर्ण


औरंगाबाद : डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या बी.कॉमच्या 11 हजार विद्यार्थ्यांना दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. अखेर बी. कॉमचे 11 हजार विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. अकरा हजार विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला होता. अखेर या प्रकरणी लक्ष कुलगुरुंनी घातल्यानंतर बी.कॉमच्या अकरा हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यात आले आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या बी. कॉमच्या परीक्षेला बसलेल्या 11321 विद्यार्थ्यांनापैकी 11137 अनुत्तीर्ण झाल्याची तक्रार कुलगुरूंकडे आली होती. याप्रश्नी औरंगबादमधील विद्यार्थी संघटनांनी कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांची भेट घेत हा प्रश्न मांडला होता. विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यात आले नाहीतर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यामुळे यावरुन गोंधळ देखील निर्माण झाला होता. या प्रकरणी चौकशी केल्यानंतर हा गोंधळ डाटा एंट्री ऑपरेटरच्या चुकीमुळे झाल्याचे समोर आले आहे.

तब्बल 11 हजार विद्यार्थी डाटा एंट्री ऑपरेटर यांच्या चुकीमुळे अनुत्तीर्ण झाले होते. अखेर अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या आदेशाने प्रवीण साबळे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. ऑपरेटरच्या चुकीमुळे एकाच वेळी अकरा हजार विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले होते.

विद्यापीठ कार्यक्षेत्रात कार्यरत असणाऱ्या विद्यार्थी संघटना बी.कॉमच्या विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण केल्यानंतर आक्रमक झाल्या होत्या. विद्यार्थी संघटनांनी विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील निकाल जाहीर करताना आलेल्या त्रुटी दाखवून दिल्या. विद्यार्थी संघटनांनी बी. कॉमची निकाल प्रक्रिया सदोष असल्याचे दाखवून दिले. पुढील काळात निकाल जाहीर झाल्यानंतर असा प्रकार आढळून आल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.