इस्रायलच्या या शस्त्रांच्या खरेदीसाठी अनेक देश उतावीळ

जगातील अन्य देशांच्या तुलनेत मुठभर असणारा देश इस्रायल मिसाईल आणि अन्य युद्ध शस्त्रे बनविण्यात अजोड आहे. या देशात बनलेली हत्यारे खरेदी करण्यासाठी जगभरातील अनेक देश उतावीळ असतात. मुठीएवढ्या आकाराच्या या देशाची हत्यारे जगभरात वापरली जातात हे विशेष.

हवा, जमीन आणि पाण्याच्या आत घुसून शत्रूच्या शस्त्रांचा अचूक वेध घेऊन शत्रूचे कंबरडे मोडण्याची ताकद असलेली ही काही शस्त्रे.

फाल्कन एअर वॉर्निंग सिस्टीम हवेत कोणताही धोका असेल तर त्वरित अॅलर्ट करणारी सिस्टीम आहे. तसेच ईएलएम २२३८ स्टार हे तेज रडार आहे. हवेत किंवा जमिनीत असलेल्या शत्रूच्या शस्त्रांना पकडीत घेण्याची त्याची क्षमता असून इस्रायलने या रडारचा पुरवठा अनेक देशांना केला आहे.

सर्चर एअरक्राफ्ट हे सर्वश्रेष्ठ मानवरहित विमान असून गेल्या वर्षी भारताला अशी विमाने इस्रायलने दिली आहेत. गेल्या काही काळात भारताने इस्रायल बरोबर शस्त्र पुरवठ्यासाठी ८ हजार कोटींचे करार केले आहेत.

डर्बी मिसाईल दिसायला साधे पण अतिशय ताकदवान असे हत्यार. इस्रायल त्यांच्या लढाऊ विमानासाठी त्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर करतो. हवेतून हवेत मारा करणारी हे सर्वात उत्तम मिसाईल्स आहेत. स्पाईक अँड अँटी टँक गायडेड वेपन असेच जगभरातून मोठी मागणी असलेले वेपन आहे. १९७० च्या दशकात अँटी टँक मिसाईल म्हणून ते वापरत होते. ५.५ फुट लांबीचे हे मिसाईल १५ सेकंदात रीलोड करून ३० सेकंदात फायर करता येते.