महिन्द्राची स्वदेशी एक्सयुव्ही ७०० स्वातंत्रदिनी येणार
महिंद्रा अँड महिंद्राची नवी एक्सयुव्ही ७०० जुलै अखेर बाजारात दाखल होईल अशी चर्चा सुरु असतानाच या एक्सयुव्हीचे टीझर प्रसिद्ध होऊ लागले आहेत. मात्र लेटेस्ट रिपोर्ट नुसार ही एक्सयुव्ही १५ ऑगस्टला म्हणजे स्वातंत्रदिनी लाँच केली जाणार आहे. गतवर्षी कंपनीने त्यांची लोकप्रिय ऑफरोडर थार १५ ऑगस्ट रोजी लाँच केली होती.
नव्या एक्सयुव्हिला कंपनीने पर्सनलाईज्ड सेफ्टी अॅलर्ट फिचर दिले असल्याचे समजते. म्हणजे यात सेट केलेल्या स्पीड लिमिटपेक्षा जास्त वेगाने कार चालविली तर ऑडीओ सेफ्टी अॅलर्ट पाठविला जातो. एक्सयुव्ही ७०० ची स्पर्धा टाटा सफारी, एमजी हेक्टर प्लस, ह्युंडे अल्काझार बरोबर असेल. एक्सयुव्ही १५ लाख्च्या रेंजमध्ये उपलब्ध होईल.
एक्सयुव्ही ७०० ला इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक्स, अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम, एडीएस फिचर्स असून उत्तम सुरक्षेसाठी सहा एअर बॅग्ज, एबीएस सह ईबीडी, आयएसओएफएम चाईल्ड सीट माउंट सह चार डिस्क ब्रेक दिले गेले आहेत.