न्युडीस्ट सिटी बद्दल ऐकलेय?

भटकंतीप्रेमींसाठी जगात अनेक पर्याय आहेत. जगभरातील देश, तेथील शहरे यांची काही ना काही खासियत असते आणि त्यामुळे अशा जागा अन्य स्थानांपेक्षा वेगळ्या ठरतात. प्रत्येक देशाची, शहराची संस्कृती यात महत्वाचे योगदान देत असते. काही जागा संस्कृती संकल्पनेला धक्का देणाऱ्या आणि म्हणून अधिक चर्चेत असतात. त्यातील अग्रक्रम ठरवायचा तर फ्रांसच्या एका शहराची बरोबरी कुठलेच शहर करू शकणार नाही. या शहराचे नाव आहे Cap D’Adge. या शहराला न्युडीस्ट सिटी म्हणून ओळखले जाते.

होय, तुम्ही बरोबर ऐकले आहे. या शहरात शॉपिंग, रेस्टॉरंटस, जिम, समुद्रकिनाऱ्यावर म्हणजे सर्वत्र कपडे न घालताच लोक भटकत असतात. बीच लाईफचा आनंद कपड्याविना घेतात. येथे मोठ्या संखेने पर्यटक येतात आणि विशेष म्हणजे पर्यटक सुद्धा कपडे न घालता हवे तेथे भटकू शकतात. या शहराच्या अनोख्या लाईफस्टाईल मुळे हे शहर नेहमीच चर्चा आणि वादविवादात असते.

जगात या प्रकारचे हे एकमेव शहर असून न्यूड टुरिझम साठी येथे फ्रांस, बेल्जियम, जर्मनी, इटली, डेन्मार्क, कॅनडा येथून खूप पर्यटक येतात. उन्हाळ्याच्या दिवसात येथे पर्यटकांची तुफान गर्दी होते. येथे पर्यटकांवर सुद्धा कोणतीही बंधने नाहीत. हे शहर प्रसिद्ध आणि लोकप्रिय हनिमून डेस्टीनेशन म्हणून सुद्धा ओळखले जाते. येथील सुंदर बीच हे प्रमुख आकर्षण आहे.

अर्थात या शहरात विना कपडे हिंडण्याची परवानगी असली तरी सार्वजनिक जागी रोमांस करण्याची परवानगी नाही. असा खुला रोमांस करणाऱ्यांना १२६८० पौड दंड भरावा लागतो. या शहरात राहण्यासाठी सुद्धा पैसे मोजावे लागतात. मुख्य म्हणजे येथे कोणत्याही प्रकारच्या फोटोग्राफीवर बंदी आहे. या शहराला भेट देणाऱ्यांनी बँका, सुपरमार्केट, रेस्टॉरंटस, केस कापण्याची दुकाने, बेकारी, जिम असे कुठेही विना कपड्याचे लोक पाहण्याची तयारी ठेवायला हवी. अर्थात येथे कपडे घालणे बंधनकारक नसले तरी तुम्ही कपडे घालून फिरू शकता.