खगोल संशोधकांनी शोधला महाप्रचंड धूमकेतू

सौरमंडळात पृथ्वीपासून दूर एक अतिप्रचंड धूमकेतू खगोल संशोधकांना दिसला आहे. या धूमकेतू सर्वसामान्य धूमकेतू पेक्षा १ हजार पटीने मोठा असल्याचे आणि आत्तापर्यंत दिसलेल्या सर्व धूमकेतू मध्ये मोठा असल्याचे सांगितले जात आहे. अमेरिकेच्या पेनसिल्व्हेनिया विद्यापीठातील विद्यार्थी पेट्रो बर्नार्डीनेली आणि खगोलतज्ञ गॅरी बर्गस्टीन यांनी या धूमकेतूचा शोध लावला असून त्याचे नामकरण सी/२०१४ युएन २७९, बर्नार्डीनेली- बर्नस्टीन असे केले गेले आहे.

या धूमकेतूचा व्यास ६२ ते १२४ मैल म्हणजे १०० ते २०० किलोमीटर असावा असा अंदाज आहे. सामान्य धूमकेतूपेक्षा हा व्यास १० पटीने रुंद आहे. स्पेस डॉट कॉमच्या रिपोर्टनुसार नॅशनल सायन्स फौंडेशनच्या नॅशनल ऑप्टिकल इन्फ्रारेड अॅस्ट्रॉनॉमी रिसर्च लॅबॉरेटरी ने आत्तापर्यंत जेवढे धूमकेतू दिसले त्यात हा सर्वात मोठा असल्याचे म्हटले आहे. हा धूमकेतू पृथ्वीपासून सध्या खूप दूर आहे.

धूमकेतूचा आकार तो सूर्याचा प्रकाश किती प्रमाणात परावर्तीत करतो त्यावरून ठरविला जातो. हा धूमकेतू २०३१ मध्ये पृथ्वीच्या सर्वात जवळ येईल तरीही हे अंतर खूप असेल असे सांगितले जात आहे. हा धूमकेतू सूर्यापासून १५ कोटी किलोमीटर अंतरावर आहे. त्याने सूर्याची एकही प्रदक्षिणा पूर्ण केली नसावी असा तर्क व्यक्त केला जात आहे.