आपल्या चित्रपट आणि हटके स्टाइलसाठी अभिनेता रणवीर सिंह नेहमीच चर्चेत असतो. बॉलिवूडचा ‘बाजीराव’ रणवीरने नुकताच ६ जुलै रोजी आपला ३६ वा वाढदिवस साजरा केला. त्याने त्यानिमित्ताने स्वतःला जगातील फास्टेस्ट कार गिफ्ट केल्यामूळे त्याच्या वाढदिवसानंतर आपल्या कोट्यावधीच्या कारमुळे रणवीर आज पुन्हा चर्चेत आला आहे. तसंच रणवीरच्या या नव्या कारची किंमत ऐकून त्याचे सगळे चाहते थक्क झाले आहेत.
रणवीरने खरेदी केलेल्या मर्सिडीज मेबॅकची किंमत आणि फीचर्स वाचूनच तुम्ही व्हाल अव्वाक
ज्याला बॉलिवूडचा बाजीराव म्हणून ओळखले जाते तो रणवीर सिंह फक्त चित्रपटांवर नाही तर प्रत्येक चाहत्याच्या मनात राज्य करतो. त्याच्यासारखे दुसरे कोणीही नाही, हे तो वेळोवेळी दाखवून देतो. कोट्यावधी चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या रणवीरकडे तितक्याच कोट्यवधी किंमतीच्या लक्झरी गाड्यांचा ताफाही आहे.
काही दिवसांपूर्वी त्याच्या या ताफ्यात लँबोर्गिनी उरुसची कार चमकत होती. त्यानंतर आता त्याच्या कारच्या ताफ्यात आणखी एक जगातील फास्टेस्ट कार सामील झाली आहे. रणवीरने आपल्या वाढदिवसाला स्वतःलाच ‘मर्सिडीज मेबॅक जीएल एस ६००’ ही महागडी कार गिफ्ट केली आहे. गेल्याच महिन्यात भारतात लॉंच झालेल्या या कारची किंमत तब्बल ३ कोटी एवढी आहे. ही कार भारतातील सर्वात महागडी कार आहे. सध्या सोशल मीडियावर या कारसोबतचा एक फोटो वेगाने व्हायरल होत आहे. तो यात कारच्या बाजुला उभा असलेला दिसून येत आहे.
रणवीरचा हा कारसोबतचा फोटो मर्सिडीज बेन्झचे डिलर ऑटो हॅंगर यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताना त्यांनी एक कॅप्शन देखील लिहिली आहे. त्यांनी यात लिहिले आहे, बॉलिवूडचा चार्म रणवीर सिंहला ऑटो हॅंगरकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…त्याची नवी कार मर्सिडीज मेबॅक जीएल एस ६०० साठी त्याचे अभिनंदन…”
गेल्या मे महिन्यातच अभिनेता रणवीर सिंहने लँबोर्गिनी उरुसचे पर्ल कॅप्सूल एडिशन खरेदी केले होते. या कारसाठी रणवीरने ४.५ कोटी रुपये मोजले होते. लँबोर्गिनी ऊरसची एक्स शोरुम किंमत ३.१५ कोटी रुपये आहे. पर्ल कॅप्सूल एडिशनसाठी किंमतीच्या २० टक्के अधिक शुल्क द्यावे लागते.
रणवीरने नुकतीच घेतलेल्या मर्सिडीज मेबॅक जीएल एस ६०० या कारबद्दल सांगायचे झाले तर स्टॅंडर्ड व्हर्जनच्या तुलनेत ही कार कित्येक पटीने प्रीमियम आहे. मेबॅक जीएल एस ६०० मध्ये वुडन इंसर्ट, नापा लेदर, 12.3 इंचचे डिजिटल इन्स्ट्रूमेंट क्लस्टर, 12.3 इंचचे इन्फोटेनमेंट सिस्टम एमबीयूएक्स इंटरफेस सोबतच हॅंडराइटिंग रिकग्निशन आणि जेस्चर कंट्रोल, इलेक्ट्रिकली-ओपनिंग पॅनोरमिक स्लाइडिंग आणि एक अपारदर्शी रोलर ब्लाइण्ड सोबत सनरूफ देण्यात आले आहे. याशिवाय या कारमध्ये क्लायमेट कंट्रोलसोबत मसाज फंक्शनदेखील देण्यात आले आहे.