रविशंकर प्रसाद आणि प्रकाश जावडेकर यांनीही दिला आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा


नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या टर्मच्या मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी अनेक दिग्गज मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. त्यात आता रविशंकर प्रसाद आणि प्रकाश जावडेकरही सामील झाले आहेत. या दोघांनीही आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. रवीशंकर प्रसाद आयटी आणि कायदा मंत्रालय तर प्रकाश जावडेकर यांनी आयबी आणि पर्यावरण मंत्रालय सांभाळले होते. यापूर्वी डॉ हर्षवर्धन आणि रमेश पोखरियाल निशंक यांच्यासह अनेक मंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

राष्ट्रपती भवनातून कळविण्यात आले आहे की, माहिती व तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद, पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर, आरोग्यमंत्री हर्षवर्धन, शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक आदींसह मंत्रिमंडळातील 12 सदस्यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी स्वीकारला. सांगायचे म्हणजे की डीव्ही सदानंद गौडा, थावरचंद गेहलोत, संतोषकुमार गंगवार, बाबुल सुप्रियो, धोत्रे संजय शामराव, रतन लाल कटारिया, प्रतापचंद्र सारंगी आणि देबाश्री चौधरी यांनीही मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.